santosh amonkar
santosh amonkar 
गोवा

शिक्षण संचालकांना तडकाफडकी हटविले

Avit bagale

अवित बगळे

पणजी :

अनुदानित विद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे वेतन शैक्षणिक संस्थांनी द्यावे, असा आदेश देऊन वाद निर्माण करत २४ तासांत तो आदेश मागे घेण्याची नामुष्की ओढवून घेतलेल्या शिक्षण संचालक वंदना राव यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. शिक्षण उपसंचालक संतोष आमोणकर यांच्याकडे शिक्षण संचालकपदाचा ताबा देण्यात आला आहे. गोव्यातील अधिकाऱ्याकडेच शिक्षण संचालकपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनीही केली होती.
राव यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी (उत्तर -१) या पदावर नियुक्त केले आहे. याशिवाय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त ताबाही त्यांच्याकडे देण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी (उत्तर १) दशरथ रेडकर यांना त्या पदावरून हटवून त्यांना सचिवालयातील कार्मिक विभागात हजेरी लावावी, असा आदेश जारी करण्यात आला आहे. शशांक मणी त्रिपाठी यांची बदली अबकारी आयुक्त पदावर झाली असून क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबाही त्यांच्याकडेच असेल.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT