Flight To Goa Dainik Gomantak
गोवा

Flight To Goa: मोपालाच पसंती, आणखी एका शहरातून सुरू झाली थेट विमानसेवा

नव्याने सुरू होणारी विमानसेवा देखील मोपा येथील विमानतळावरच उतरण्यासाठी पसंती देत आहे.

Pramod Yadav

Flight To Goa: जानेवारी 2023 पासून उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर विमानतळ कार्यान्वित झाले. मनोहर विमानतळामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नव्याने सुरू होणारी विमानसेवा देखील मोपा येथील विमानतळावरच उतरण्यासाठी पसंती देत आहे.

देशातील अनेक शहरातून मोपासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील आणखी एका राज्यातील महत्वाच्या शहरातून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि परिसरातील प्रवाशांना यापुढे गोव्यात जाण्यासाठी इंदूरला जाण्याची गरज भासणार नाही. गोव्याला जाणाऱ्या नागरिकांना भोपाळच्या राजा भोज विमानतळावरूनच गोव्यासाठी थेट विमानसेवा मिळणार आहे. इंडिगो 23 मे पासून भोपाळ-गोवा विमानसेवा (Bhopal - Goa Flight) सुरू करणार आहे. हे उड्डाण गोव्यात सुरू झालेल्या मोपा विमानतळावरून चालणार आहे.

सुरुवातीला मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12.10 वाजता उड्डाण करेल. इंडिगो एअरलाइन्सने विमानतळ व्यवस्थापनाला 23 मे पासून थेट उड्डाणे सुरू करण्याची सूचना केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) यापूर्वी इंडिगो कंपनीला भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. खरे तर गोव्याला विमानसेवा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. आता ते सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

इंडिगोचे भोपाळ ते गोवा थेट विमान आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री 12.10 वाजता भोपाळ विमानतळावरून उड्डाण करेल. त्याचे प्रारंभिक भाडे 4,088 रुपये निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना इंदूरला जावे लागत होते.

सुरुवातीच्या टप्प्यात भोपाळ ते गोवा हे विमान आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करेल. प्रवाशांची संख्या वाढल्यास आठवड्यातील सातही दिवस सेवा सुरू करण्यात येईल, असे विमानतळ संचालकांनी म्हटले आहे. इंडिगोच्या या सेवेमुळे गोव्यात जाणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT