Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दिलीप परुळेकर यांनी ताळतंत्र सोडून बोलू नये; श्रीपाद नाईक

Goa Politics: श्रीपाद नाईक यांचे विधान पक्षशिस्‍त मोडणारे

दैनिक गोमन्तक

Goa Politics: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी बोलताना तारतम्‍य बाळगावे, ताळतंत्र सोडू नये. त्यांनी माझ्‍याविषयी जाहीरपणे केलेले विधान हे पक्षशिस्तीला धरून नाही.

पक्षात थोडी बेशिस्‍त आली आहे हे मान्‍य करावे लागेल, असे प्रत्युत्तर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज दै. ‘गोमन्तक’शी बोलताना दिले.

संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या गोमन्तक टीव्हीवरील कार्यक्रमात दिलीप परुळेकर यांनी श्रीपाद नाईक यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते उत्तरेत चारही आमदार निवडून आणू शकत नाहीत आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्यास ती आपणास द्यावी अशी मागणी केली होती.

त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नाईक म्हणाले की, परुळेकर हे पक्षाचे राज्य उपाध्यक्ष असल्याने मी संयमाने बोलत आहे. लोकसभेवर पाच वेळा निवडून येण्यामागे मी केलेली जनतेची कामे कारणीभूत आहेत.

जनतेची कामे न करणाऱ्यांना जनता घरी बसवते हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. राजकीय कार्यकर्त्याला उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार असतो. मात्र त्याची वाच्यता पक्षाचे पदाधिकारी व संसदीय मंडळापुरती मर्यादित हवी.

उमेदवारी मागून मिळत नसते

  • लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय भाजपचे दिल्लीतील संसदीय मंडळ घेते. त्याआधी राज्यस्तरीय निवडणूक समिती नावांची शिफारस करते.

  • मला उमेदवारी नाकारल्यास ती आपणास द्यावी असे परुळेकर यांनी म्हटले आहे. त्यांची तशी इच्छा असण्यात काही वावगे नाही.

  • पण त्‍यांनी आपली मागणी योग्य मंचावर केली पाहिजे. उघडपणे अशी मागणी करून भाजपची उमेदवारी कोणाला मिळत नाही, असे नाईक म्‍हणाले.

पर्रीकरांनी दिलेले श्रेयसुद्धा नाकारले

भाजपमध्ये पक्षाने घेतलेल्या निर्णयाची कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी करावयाची असते. पर्वरीत गोविंद पर्वतकर यांच्या पराभवाला अनेक कारणे होती, त्याची आता जाहीर चर्चा नको.

स्व. मनोहर पर्रीकर यांनी २०१२ मधील अभूतपूर्व यशाचे निम्मे श्रेय मला दिले होते, तेव्हाही मी ते नाकारले होते. आम्ही पक्षाचे शिस्तबद्ध सैनिक आहोत. पक्ष देईल ती भूमिका वठवणे हीच आमची शिस्त आहे, असे नाईक म्‍हणाले.

मी चारही आमदार निवडून आणू शकत नाही असे चुकीचे वक्तव्य दिलीप परुळेकर यांनी केले आहे. भाजपमध्ये कोणीही नेता अन्‍य पक्षांप्रमाणे उमेदवार निवडून आणत नाही. भाजपचे कार्यकर्ते सामूहिकपणे काम करतात. यश, अपयश हे प्रत्येकाचे असते. त्यास कोण एक व्यक्ती जबाबदार नसते. परुळेकर यांनी ताळतंत्र सोडू नये.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री
मी कोणतीही पक्षशिस्त मोडलेली नाही. श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देऊ नका, ती मला द्या असे मी म्हटलेले नाही. त्यामुळे नाईक यांचा आक्षेप असण्याचे कारणच नाही, असे दिलीप परुळेकर यांनी सांगितले. नाईक यांना उमेदवारी दिली नाही तर ज्येष्ठतेमुळे ती उमेदवारी मला मिळावी असे जाहीरपणे मी म्हणण्यात काहीच वावगे नाही. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलेले आहे. त्या अनुषंगाने मी बोललो. पक्षपातळीवर देखील माझी इच्छा मी मांडलेली आहे. मी ताळतंत्र सोडून वक्तव्य केलेले नाही. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता या नात्याने उमेदवारी किंवा पद मागणे हा माझा अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही परुळेकर म्‍हणाले.
उमेदवारी किंवा पद मागणे हा माझा अधिकारच : परुळेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT