MLA digambar kamat Dainik Gomantak
गोवा

Salcete News : गरिबांचा विचार करतो, म्हणून जिंकतो - दिगंबर कामत

अशा बेकायदेशीर गाडेवाल्यांसाठी व जे रस्त्यावर विक्रेते बसतात त्यांच्यासाठी ‘वेंडर्स झोन’ म्हणजेच विक्रेत्यांसाठी खास जागा उपलब्ध करण्याचा आपला मानस आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete News : सासष्टी, आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते प्रभाग १३ मधील भिंत बांधणे, सौंदर्यीकरण करणे व रस्ता रुंद करणे या विकासकामांचा आज प्रारंभ करण्यात आला.

यावेळी मडगावमधील बेकायदेशीर गाड्यांसदर्भात विचारलेल्या प्रश्र्नाचे उत्तर देताना कामत म्हणाले, की मी गरिबांच्या पोटावर पाय देत नाही, म्हणूनच मडगावातून निवडून येतो. तसे पाहिल्यास मडगावमधील जास्तीत जास्त गाडे बेकायदेशीरच आहेत.

अशा बेकायदेशीर गाडेवाल्यांसाठी व जे रस्त्यावर विक्रेते बसतात त्यांच्यासाठी ‘वेंडर्स झोन’ म्हणजेच विक्रेत्यांसाठी खास जागा उपलब्ध करण्याचा आपला मानस आहे.

एकदा का जागा उपलब्ध केली की मग या सर्वांना तिथे हलविले जाईल, असेही कामत यांनी सांगितले.

कोंब भागात रेल्वे गेटजवळ श्री दामोदर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर विकासकामाचा आज शुभारंभ करण्यात आला.

हे काम जवळजवळ २२ लाख रुपयांचे असून जागा प्रथम स्वच्छ केली जाईल व नंतर तिथे भिंत उभारली जाईल, शिवाय शेजारील नाल्यांची दुरुस्तीही केली जाईल, असे कामत यांनी सांगितले.

मडगावातील १३ विकासकामांना मंजुरी

मडगाव शहरात १३ विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील २ ते ३ कामांना सुरवात करण्यात आली नव्हती. त्यातील हे एक काम असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.

मडगावमधील इतरही बरीच विकासकामे करायची असून त्यात शाळांमध्ये सोलर वीजपुरवठा, पाणी साठवणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

यासाठी शाळांची पाहणी करून सर्वेक्षण केले जाईल व नंतर कामाला सुरवात केली जाईल. शहरातील २० विहिरींच्या दुरुस्तीचाही प्रस्ताव असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: त्या 'मॅडम'ना पकडून देण्याचा सर्व जनतेचा निर्धार!

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

Camurlim Gram Sabha: कामुर्ली ग्रामसभेत राडा! महिला उपसरपंचास तरुणाकडून मारहाण; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

SCROLL FOR NEXT