digambar kamat Dainik Gomantak
गोवा

Goa Election: निवडणुकीत भाजपच विजयी होणार; दिगंबर कामत

Goa Election: मडगावात संकल्प यात्रेचे स्वागत

दैनिक गोमन्तक

Goa Election: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे. कारण भाजपने केलेले संकल्प, आश्‍वासने पूर्ण केली आहेत. मोदींची गॅरंटी ही शंभर टक्के असते. भाजप सरकारने सदैव जनतेचे हित जपले असून चौफेर विकास केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे,

असे मत आमदार दिगंबर कामत यांनी मडगावात भारत विकास संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

मडगावात आज आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, सत्ताधारी नगरसेवक, नगरपालिका अधिकारी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारत विकास संकल्प यात्रेचे स्वागत केले. याच संधीचा फायदा घेत आमदार कामत यांनी आगामी निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा अप्रत्यक्षरीत्या नारळच फोडला.

सेवक, खेळाडूंचा गौरव

याप्रसंगी समाज सेवक, खेळाडू, नगरपालिका कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात माजी शिक्षक रंजन नाईक, रामचंद्र ऊर्फ चंदू आचार्य, बुद्धिबळपटू दिया दिगंबर सावळ, हिंदू स्मशान भूमितील कर्मचारी आबा, ज्येष्ठ नर्स इंदू देसाई, आमांदा डिसोझा, सुनंदा जामुनी, देमव्वा जामुनी, भारत नाईक यांचा समावेश आहे. याप्रसंगी लाडली लक्ष्मी व विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थी अनुक्रमे रिया जामुनी व सुश्मिता नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT