Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

स्वप्नाळू आणि अव्यवहारी अर्थसंकल्प: दिगंबर कामत

दिगंबर कामत: शिक्षण क्षेत्रासाठी तरतूदच नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा स्वप्न दाखवणारा, अव्यवहारी आणि प्रत्यक्षात न उतरणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी केली. विरोधी पक्षाच्या कार्यालयात ते बोलत होते. यावेळी आमदार संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रूडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.

यावेळी कामत म्हणाले, 2021-22 च्या अर्थसंकल्पातील 56 टक्के तरतुदी प्रत्यक्षात उतरलेल्याच नाहीत. हा नव्या अर्थसंकल्पात केवळ पाठीमागच्या अर्थसंकल्पातील तरतुदी नव्याने मांडलेल्या आहेत. यात नवीन काहीच नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्याला पुढे नेण्याऐवजी मागे नेणारा आहे. हे सरकार पर्यावरणविरोधी असून आम्ही त्यांच्या पर्यावरण विरोधाला नेहमी विरोध करत राहू. अर्थसंकल्पामध्ये तिन्ही लिनियर प्रकल्प रद्द करण्याबाबत कोणतीच तरतूद नाही. शहिदांच्या पत्रादेवी येथील स्मारकासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, असोळणा आणि कुंकळ्ळी येथील स्मारकाबाबत कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही. शिक्षण क्षेत्रातील साधनसुविधांच्या बाबतीतही या अर्थसंकल्पात तरतूद नसल्याची टीका कामत यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT