Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : दिगंबर कामत लढवणार लोकसभेची निवडणूक

तूर्तास सल्लागाराची भूमिका घेत मुख्यमंत्र्यांबरोबर सुप्त स्पर्धाही टाळणार

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : काँग्रेस पक्षात फूट घालून 8 जणांनी काल बुधवारी 14 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला असला तरी त्यांना काय मलई मिळेल याची मात्र वाच्यता करण्यात आलेली नाही. या 8 जणांपैकी दोघांना मंत्रिपद मिळू शकते. परंतु दिगंबर कामत यांनी मात्र कोणतेही पद स्वीकारायचे नाही असे ठरविले आहे.

भाजपाशी निकट असलेल्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कामत यांनी भाजपात प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा संपूर्ण मान-सन्मान राखण्याचे दिल्ली पक्षश्रेष्ठींनी मान्य केले आहे. परंतु कामत यांनाच स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपद नको आहे. कामत यांनी यापुढेही मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषविली आहेत. मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळात ते दुसऱ्या स्थानावर होते आणि लोकप्रियही बनले होते. 5 वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळून स्थिर सरकार दिल्याचाही मान दिगंबर यांना प्राप्त होतो. कामत यांचे राजकारणातील स्थान व दबदबा लक्षात घेता ते स्वतः दुय्यम स्थान स्वीकारण्यास राजी होणार नाहीतच. शिवाय केंद्रही त्याबाबत आग्रही राहणार नाही. परंतु कामत यांचा सरकारात मान राखण्याचे केंद्राचे धोरण राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी सल्लागाराच्या भूमिकेत कामत असतील व पक्ष संघटनेमध्येही त्यांच्या सहकाऱ्यांना सामावून घेण्यात येणार आहे.

कामत यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्याऐवजी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवावी व केंद्रात जावे अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी त्यांना केल्या असून कामत यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे.

कामत स्वतः पदांपासून दूर

‘कामत यांना कोणतेही महत्त्वाचे मंत्रिपद देण्यास पक्षश्रेष्ठी तयार होते. परंतु दिगंबर कामत यांनी स्वतःच राज्यात आपल्याला मंत्रिपद नको अशी भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे लागले असते व मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची सुप्त स्पर्धाही सुरू होण्याची शक्यता होती. त्यामुळे कामत यांनीही स्वतः अशा पदांपासून दूर राहण्याचे ठरविले आहे’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT