Pramod Sawant and Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

'दिगंबर कामतांनी आपल्या स्वार्थासाठी अल्पसंख्याक मतदारांचा वापर केलाय'

सरदेसाई यांच्या खोट्या गोयंकारपणाला जनतेने बळी पडू नये; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

काँग्रेसने यंदा आर्वेतीन फुर्तादो यांच्यासारख्या नाकारलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसला यावेळी जनता त्यांची जागा दाखवणार आहे, अशी टीका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. भाजप 22 पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेल. सासष्टीच्या जनतेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन या संधीचे सोने करून घ्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या वेळी आम्ही ‘मिशन सासष्टी’ राबवे होते. पण यावेळी सासष्टीतील जनता आमच्याबरोबर आहे. दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि विजय सरदेसाई यांनी आपल्या स्वार्थासाठी अल्पसंख्याक मतदारांचा वापर करुन घेतलाय. कामत यांनी प्रयत्न केले असते तर मडगावात प्रकल्प पूर्ण झाले असते. कामत यांनी मडगाव (Margao) विकसित करण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जास्त मेहनत घेतली, असा आरोप प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केला.

विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्यावर टीका करतांना कब्रस्तानासाठी नियोजित केलेल्या जमिनीचे रूपांतरण कसे झाले यावर स्पष्टीकरण द्यावे असे आव्‍हान मुख्‍यमंत्र्यांनी दिले. ‘अच्छे दिन’ कोणते होते असा प्रश्न विचारणाऱ्या दिगंबर कामत यांनी 2012 पूर्वीची काँग्रेस (Congress) राजवट आठवावी. कामत यांच्या कार्यकाळात सर्वांत जास्त भ्रष्टाचार झाला होता असा आरोप त्यांनी केला.

कामत आणि सरदेसाई यांनी कचरा, सोनसोडोचा प्रकल्प, कब्रस्तान, पार्किंग प्रकल्प आणि बसस्थानक प्रकल्पावरून केवळ राजकारण करण्याचे काम केले आहे. त्यांचे खरे चेहरे आता लोकांसमोर आलेले आहेत. सरदेसाई यांच्या खोट्या गोयंकारपणाला जनतेने बळी पडू नये असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT