Digambar Kamat |Goa News Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: मुलांनो, विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरा- दिगंबर कामत

Digambar Kamat: दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

दैनिक गोमन्तक

Digambar Kamat: आजच्या शैक्षणिक पद्धतीत विज्ञान व तंत्रज्ञान महत्त्‍वाची भूमिका बजावत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाद्वारे नावीन्यपूर्ण कल्पना सुचत असतात. म्‍हणून आज त्‍यास जगात मोठी मागणी आहे. या क्षेत्रात जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत खूप पुढे आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरून आपले भवितव्‍य उज्ज्‍वल बनवावे, असे आवाहन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले.

मठग्रामस्थ हिंदू सभेच्या श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय १७व्या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात कामत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. हे प्रदर्शन भरविण्यास मडगावच्या आकाश इन्स्टिट्यूट व गोवा सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सहकार्य लाभले.

जी व्यक्ती परिस्थितीनुरुप योग्य काम करते, तीच या जगात तग धरू शकते. म्‍हणूनच विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आहे. या क्षेत्रात भारताला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत, असे कामत म्हणाले.

घोगळ-मडगाव येथील श्री मारुती मंदिराच्या बाबू नायक सभागृहात 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात गोव्यातील 44 प्राथमिक शाळा व 15 उच्च माध्यमिक विद्यालयांतील 225 विद्यार्थ्यांनी व 120 शिक्षकांनी 150 प्रकल्प सादर केले. शिवाय दोन दिवसांत 13 शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती मिळवली.

समारोप सोहळ्यात मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग ऊर्फभाई नायक यानी सर्वांचे स्वागत केले. आकाश इन्स्टिट्यूटचे इम्रान खान तसेच प्रदर्शनात भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले विचार व्यक्त करताना मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी गुजराती समाज ट्रस्टच्या विद्यार्थ्यांचा सर्जनशील प्रतिभा दाखवल्याबद्दल खास गौरव करण्यात आला.

व्यवस्थापन समितीच्‍या प्रतिनिधी रिमा कुंदे, प्रा. राजीव देसाई, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष पराग रायकर, अनिल पै, विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक उद्धव काणेकर, विद्यार्थी प्रतिनिधी रोहन खोलकर व स्वयंम फळदेसाई यांची समारोप सोहळ्‍याला उपस्‍थिती होती.

सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले. पहिल्या दिवशी गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. रेश्मा राऊत देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT