Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

दिगंबर कामत काँग्रेसवर 'नाराज' असल्याची चर्चा

दिल्लीला रवाना: नेतेपदाची निवड करताना विश्‍वासात न घेतल्याची खंत

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मायकल लोबो तर प्रदेशाध्यक्षपदी अमित पाटकर यांना नेमले आहे. मात्र, निवडीच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी आपल्याला विश्‍वासात घेतले नाही, या कारणास्तव ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रक पाहूनच ही गोष्ट समजल्याने त्यांनी निकटच्या सहकाऱ्यांकडे याबाबतची व्यथा बोलून दाखवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस समर्थकांनी दोन दिवसांपूर्वी कामत यांच्या निवासस्थानी धडक दिली. मडगावच्या नेत्याने पक्षश्रेष्ठींना जाब विचारावा आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी आमदारकीचाही राजीनामा द्यावा, अशी समर्थकांची इच्छा होती.

यावेळी कामत यांनी व्यथा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे हिमतीने सारस्थ केले. निधी गोळा करून तो उमेदवारांना पोचवला. अनेक मतदारसंघांत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत सभाही संबोधित केल्या. या निवडणुकीत आक्रमकरीत्या पक्षाचे नेतृत्व करणे आवश्‍यक होते आणि मी त्याकामी किंचितही कमी पडलो नाही. तरीही पक्षश्रेष्ठींनी मला विश्‍वासात घेतले नाही.’

पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनीच या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. निवड जाहीर करण्यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेले दोन दिवस कामत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधला असल्याचीही चर्चा आहे. कामत यांच्या निकटवर्तीयांनी मात्र या केवळ अफवा असल्याचे मत व्यक्त केले.

कोणत्या निकषावर निवड?

काँग्रेसचे 22 जरी आमदार जिंकून आले असते तरी त्यांनी मला विधिमंडळ पक्षाचा नेता बनवले नसते अशी तिखट प्रतिक्रिया पक्षाच्या या पवित्र्याबद्दल त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कोणत्या निकषावर नेत्यांची निवड केली त्याबाबत बरीच मासलेवाईक चर्चा गोव्यात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT