Bicholim Market Shop Demolition Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीत पोलिसांनी ‘ते’ वादग्रस्त गाळे हटवले

पालिकेची कारवाई: रात्री उशिरापर्यंत जेसीबीद्वारे काम

दैनिक गोमन्तक

डिचोली बाजारातील ‘ते’ वादग्रस्त पत्र्यांचे गाळे हटविण्याचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. आज (गुरुवारी) सकाळपासून पोलिस बंदोबस्तात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गाळे हटविण्याची कारवाई सुरू करून सायंकाळपर्यंत पाचहून अधिक गाळे हटविले. रात्री उशिरापर्यंत जेसीबी यंत्राच्या सहकार्याने गाळे हटविण्याचे काम सुरू होते.

या कारवाई सुरू करताना नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक नीलेश टोपले आणि पालिकेचे अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते. गाळे हटविण्याचे काम सुरळीतपणे सूरू होते. ही कारवाई उद्याही सुरु राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन बाजार संकुल प्रकल्प बांधण्यासाठी पाच वर्षापूर्वी बाजारातील गणपती पूजन मंडपासमोरील गाडे हटविण्यात आले होते. त्या गाडेधारकांची तात्पुरती व्यवस्था म्हणून मासळी मार्केट समोरील मोकळ्या जागेत एका रांगेत पत्र्यांचे गाळे उभारण्यात आले होते.

नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पत्र्यांच्या गाळ्यांत व्यवस्था केलेल्या गाळेधारकांना नवीन प्रकल्पात स्थलांतरीत करण्यात आले, तरीही काहींनी पत्र्याच्या गाळ्यांचा ताबा सोडला नव्हता. या गाळ्यांमध्ये काही भाजीविक्रेते परस्पर आपले सामान ठेवत होते. यावरून दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत गरमागरम चर्चाही झाली होती. हे गाळे हटविण्याचा निर्णयही बैठकीत झाला होता. अखेर आज, उद्या करीत आज (गुरुवारी) कारवाई हाती घेण्यात आली.

आठ गाळ्यांवरील कारवाई लांबणीवर

डिचोली बाजारातील मासळी मार्केट समोर पत्र्यांचे 24 गाळे उभारण्यात आले होते. त्यातील 16 गाळे सध्या काढण्यात येणार आहेत. उर्वरित आठ गाळ्यां विरोधातील कारवाई लांबणीवर पडणार आहे. तांत्रिक कारणामुळे 8 गाळे तूर्तास हटविण्यात येणार नाहीत. तांत्रिक मुद्दा सुटला, की लगेचेच हे गाळे हटविण्यात येणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

Viral Video: मृत्यूच्या दाढेत 4 तास! रोलर कोस्टर बंद पडल्यानं 100 फूट उंचीवर अडकली 8 शाळकरी मुलं; 22 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

खरी कुजबुज: काय, काँग्रेसने 'चिफ सेल्स ऑफिसर' नेमलाय?

SCROLL FOR NEXT