सुदीन ढवळीकर  Dainik Gomantak
गोवा

विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना न घेतल्याने ढवळीकर आक्रमक

अधिवेशन (Convention) दोन दिवसांचे असल्याने प्रत्येक दिवशी फक्त दोनच लक्ष्यवेधी सूचनना चर्चेला घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने (Advisory Committee) घेतला होता

दैनिक गोमन्तक

पणजी: संजीवनी साखर कारखान्याबाबतची (Sugar factories) लक्ष्यवेधी वारंवार विधानसभेत मांडूनही तो विषय चर्चेला घेतला जात नसल्याने त्याच्या निषेधार्थ आमदार (MLA) सुदिन ढवळीकर यांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. लक्ष्यवेधी सूचना घेण्याची मागणी करत त्यांनी शून्यतासाच्या कामकाजावेळी हौदात ठाण मांडले. त्यांना अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) यांनी साथ दिली. सभापतींनी कामकाज 2.30 वाजेपर्यंत तहकूब केले मात्र मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते बसून राहिले.

शून्यतासाच्यावेळी मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी संजीवनी साखर कारखान्यातील उत्पादनसंदर्भात माहिती काल मागितली होती ती आज देताना मगोचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी या कारखान्यासंदर्भातचा लक्ष्यवेधी सूचना घेण्यात आली नसल्याने निषेध केला. तीनवेळा ही सूचना विधानसभेत मांडण्यात आली मात्र तिन्हीवेळा ती घेण्यात आली नाही. शून्यतासासाठी ती ठेवण्यात आली. विरोधी पक्षनेते कामत यांच्या दोन लक्ष्यवेधी सूचनांना परवानगी देण्यात आल्याने त्यांनी सभापतींच्या कामकाजाचा निषेध केला.

या अधिवेशनात 17 ते 18 लक्ष्यवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्यातील महत्त्वाच्या सूचना चर्चेसाठी घेण्यात आल्या आहेत. हे अधिवेशन दोन दिवसांचे असल्याने प्रत्येक दिवशी फक्त दोनच लक्ष्यवेधी सूचनना चर्चेला घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने घेतला होता त्यानुसार त्या घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिल्यावर ढवळीकरांनी त्याचा जाब विचारण्यासाठी हौदात धाव घेतली. जोपर्यंत त्यांची लक्ष्यवेधी सूचना (suggestions) कामकाजात मांडून घेतली जात नाही तोपर्यंत हौदात ठाण मांडून राहणार असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Goa Live News: तांबडी सुर्ला येथे तरुणाईचा 'सूर्यनमस्कार'ने नूतन वर्षारंभ

SCROLL FOR NEXT