Dhavali road completion, Dhavali Goa development, 25 years delayed road work Dainik Gomantak
गोवा

Dhavali: ..तब्‍बल 25 वर्षांनी संपली प्रतिक्षा! 15 कुटुंबांना मिळणार रस्ता; वरचावाडा-ढवळी रोडसाठी 1.5 कोटी येणार खर्च

Dhavali Road: गेला बराच काळ प्रलंबित असलेल्या वरचावाडा-ढवळी येथील या रस्त्याच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: वरचावाडा-ढवळी येथील सुमारे पंधरा कुटुंबांना रस्ता मिळण्यासाठी पंचवीस वर्षे वाट पहावी लागली. हा रस्ता बांधण्यासाठी अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करून या भागाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पंचायतीच्या सहकार्याने सदर रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी केला.

कवळे पंचायतीच्या प्रभाग क्रमांक सहामधील या रस्‍ताकामाच्‍या उद्‌घाटनाला ज्येष्ठ नागरिक दुर्गादास ढवळीकर, कुसुम ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, कवळे सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता देवेंद्र वेलिंगकर, साहाय्‍यक अभियंता महानंद शेट, उद्योजक देवेंद्र ढवळीकर, पंचसदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधी दुर्गादास ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

दीड कोटी रुपये येणार खर्च

गेला बराच काळ प्रलंबित असलेल्या वरचावाडा-ढवळी येथील या रस्त्याच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. पंधरा कुटुंबांसह इतरांनाही त्याचा लाभ होणार आहे. या रस्त्याला संरक्षक भिंतीचे कामही करण्यात येणार आहे.

ना हरकत दाखला महत्त्वाचा

एखादे विकासकाम करताना ना हरकत दाखला महत्त्वाचा असतो. तो न मिळाल्यास विकासकामे अडकून पडतात. मडकई पंचायत क्षेत्रातील एका रस्त्याचे काम अडकून पडले आहे. त्याचा संदर्भ देऊन जमीनदार तसेच जमीनमालकांनी एखाद्या सार्वजनिक विकासाच्या कामासाठी साहाय्य करताना त्यामागील चांगला हेतू लक्षात घ्यावा, असे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT