Pravin Arlekar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Dhargal: 'त्यांनी’ दलित युवकाला एकाकी पाडले- मनोहर धारगळकर

Dhargal: या संदर्भात आमदार आर्लेकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडू,असे सांगितले.

दैनिक गोमन्तक

Dhargal: धारगळ येथील प्रशांत धारगळकर यांना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी जातीवाचक उल्लेख करून शिवीगाळ करून अंगावर धावून गेले नसल्याचे सांगणाऱ्यांनी केवळ स्वार्थासाठी आमदार आर्लेकर यांची वकिली करून दलित युवकाला एकाकी पाडले, असा आरोप धारगळचे जि.पं. सदस्य मनोहर धारगळकर, प्रशांत धारगळकर, आत्माराम धारगळकर नामदेव धारगळकर ,नेहा धारगळकर ,सहदेव धारगळकर यांनी केला.

मनोहर धारगळकर म्हणाले की, पत्रकार परिषद घेणारे हे लोक आदल्या दिवशी माझ्या घरी आले व प्रशांत धारगळकर प्रकरण आम्ही लावून धरूया. आमचा प्रशांतला पाठिंबा आहे, असे सांगून गेले.

मात्र, दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आमदारांनी प्रशांत धारगळकरला जातीवाचक शिव्या दिल्या नाहीत, लाथ हाणण्यास वैगेरे गेले नाहीत, असे सांगितले. या लोकांना आमिष वैगरे दाखवले असेल व स्वार्थापोटी ते असे बोलले असावेत.

नामदेव धारगळकर म्हणाले की,आमदार आर्लेकर यांनी प्रशांत धारगळकर याला जातीवाचक शिवीगाळ केली नाही, असा निर्वाळा देणारे सतीश कोरगावकर, दिवाकर जाधव, सिध्देश पेडणेकर, सखाराम कोरगावकर हे पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होते का,असा सवाल केला आहे. नेहा धारगळकर यांनी सांगितले, की या प्रकारामुळे आमचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.

आमदारांकडून प्रतिक्रिया नाही !

दरम्यान, या संदर्भात आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी संपर्क साधून पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आमदार आर्लेकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडू,असे सांगितले. मात्र नंतर दोन दिवस उलटूनही या विषयावर त्यांनी मौन सोडलेले नाही.

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या विरोधात पोलिस तक्रार दिल्यावर घरी येऊन मला धीर देणारे पत्रकार परिषद घेऊन आमदार आर्लेकर असे करणारच नाहीत, अशी हमी देतात, याचे आश्‍चर्य वाटते. भीतीपोटी मी टॅक्सी व्यवसाय बंद ठेवून घरी आहे. -प्रशांत धारगळकर, तक्रारदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT