Dhanagar Samaj In Goa Dainik Gomantak
गोवा

Dhangar Samaj: सांगेत धनगर समाजाचा महोत्सव

गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या सांगे शाखेतर्फे 17वा अखिल गोवा धनगर महोत्सव होत आहे.

दैनिक गोमन्तक

Dhangar Samaj: गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या सांगे शाखेतर्फे 17वा अखिल गोवा धनगर महोत्सव होत आहे. सांस्कृतिक कला आविष्कार कार्यक्रम कला आणि संस्कृती खाते तसेच माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.22) सकाळी 11 वाजता वालकिणी उगे वसाहत क्र. एकमध्ये भरगच्च कार्यक्रमांनिशी आयोजित करण्यात आला.

अशी माहिती सांगे धनगर समाजाचे अध्यक्ष सदा डोईफोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खजिनदार रवी वरक, सुदेश यमकर, भैरो झोरे व जानू ताटे उपस्थित होते.

डोईफोडे म्हणाले की, महोत्सवाचे उद्‍घाटन अखिल गोवा धनगर समाजाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार वासुदेव गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सरपंच भारती नाईक, उपसरपंच रामा पांढरमिसाळ व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संध्याकाळी बक्षीस वितरण समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भाटीचे सरपंच चंद्रकांत गावकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संध्याकाळी 5.30 वा. बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते धनगर समाजातील दहावी, बारावी व पदवी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, तसेच क्रीडापटूंचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती रवी वरक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT