Goa Police Alok Kumar  Dainik Gomantak
गोवा

DGP Alok Kumar: गुन्‍हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्‍न करा, तक्रारदाराशी सौजन्‍याने वागा; महासंचालकांचा सल्‍ला

Goa Police: आलोक कुमार यांनी महासंचालकपदाचा ताबा घेतल्‍यानंतर त्‍यांची मडगाव पोलिस मुख्‍यालयाला दिलेली ही पहिलीच भेट होती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कन्‍हैय्‍याकुमार मंडल खुनासह मागच्‍या महिन्‍याभरात दक्षिण गोव्‍यात कित्‍येक गुन्‍हेगारीच्‍या घटना घडल्‍या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी आज मडगावच्‍या दक्षिण गोवा पोलिस मुख्‍यालयाला भेट देत जिल्‍ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गुन्‍हेगारी घटना नियंत्रणात आणण्‍यासाठी प्रयत्‍न करा तसेच तक्रार घेऊन येणाऱ्या तक्रारदाराशी सौजन्‍याने वागा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

आलोक कुमार यांनी महासंचालकपदाचा ताबा घेतल्‍यानंतर त्‍यांची मडगाव पोलिस मुख्‍यालयाला दिलेली ही पहिलीच भेट होती. यावेळी झालेल्‍या चर्चेत शहरातील वाहतूक सुरळीत होण्‍यासाठी आवश्‍‍यक ती उपाययोजना हाती घेण्‍याच्‍याही सूचना त्‍यांनी केल्‍या. दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यावेळी त्‍यांच्‍याबराेबर उपस्‍थित होत्‍या.

आज त्‍यांनी कोलवा पोलिस स्‍थानकाला भेट देऊन या पाेलिस स्‍थानकाची पाहणी केली. कोलवाचे पोलिस स्‍थानक हे एका खासगी घरात चालते. ही इमारत आता मोडकळीस आली आहे. कोलवा पोलिस स्‍थानक नवीन जागेत उभारण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. यासाठी जमीन संपादन करण्‍यासाठी स्‍थानिक कोमुनिदादशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती सुनीता सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT