Devotees left for Pandharpur from Bicholim | Ashadhi Ekadashi  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातून पायी वारीला प्रारंभ; पाऊले चालती पंढरीची वाट!

डिचोलीतून 130 विठ्ठलभक्त जयघोष करीत निघाले पंढरपूरला

दैनिक गोमन्तक

डिचोली : टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा तुकाराम, माऊली तुकाराम’ आदी श्री विठ्ठलनामाचा जयघोष करीत डिचोलीतून 130 विठ्ठलभक्त आज पायी वारी करीत पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाले. अपरांत सेवा प्रतिष्ठानच्या माऊली वारकरी मंडळाच्या बॅनरखाली आणि पायीवारीचे प्रणेते उदयबुवा फडके यांच्या नेतृत्वाखाली हे वारकरी आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा तिरी भरणाऱ्या विठ्ठलभक्तांच्या मेळ्यात सहभागी होणार आहेत.

(Devotees left for Pandharpur from Bicholim for Ashadhi Ekadashi)

देवदेवतांचे आशीर्वाद घेतल्यानंतर पंढरीच्या विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांनी लिंगाची कोंड-वाठादेव येथील तीर्थक्षेत्रावरून या पायी वारीला प्रारंभ केला. वाठादेवहून डिचोलीमार्गे वारकरी प्रवासासाठी निघाले आहेत. एका बाजूने पावसाळी वातावरण, त्यातच पायी वारीला सुरवात करताना आकाशात नभ दाटले होते. तरीदेखील विठ्ठलभक्त वारकऱ्यांमध्ये मात्र चैतन्यदायी वातावरण पसरले होते.

तेरा दिवस पायी प्रवास

या वारकऱ्यांमध्ये ज्येष्ठ विठ्ठलभक्तांसह महिला वारकऱ्यांचाही समावेश आहे. तेरा दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूर गाठणार आहेत. दुपारी आणि रात्री ठराविक ठिकाणी आश्रय घेत वारकरी मार्गक्रमण करणार आहेत. ‘कोविड’ महामारीमुळे गेली दोन वर्षे पायी वारी करता आली नव्हती. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पायी वारी करण्याची संधी मिळाली आहे.

आमदारांकडून शुभेच्छा

पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये लिंगाची कोंड-वाठादेव येथे उपस्थित राहिले होते. त्यांनी विठ्ठलभक्त वारकऱ्यांचे अभिनंदन करताना पायी वारी निर्विघ्नपणे पार पडो अशी शुभेच्छा दिली. यावेळी कारापूरचे माजी सरपंच लक्ष्मण गुरव तसेच गजानन डांगी उपस्थित होते. पायी वारीचे प्रस्थान होताना विठ्ठलभक्त वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT