Dr. Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

साळ येथील नाल्यासाठी 5 लाखांचा निधी खर्च होणार

आमदार चंद्रकांत शेट्ये यांची माहिती; संपूर्ण गाळ काढून संरक्षक भिंत उभारणार

दैनिक गोमन्तक

डिचोली : साळ गाव हा निसर्ग संपन्न आहे. गावात आल्हाददायक वातावरण असल्याने प्रदूषण होऊ नये, यासाठी नाल्यांची स्वच्छता वेळोवेळी होणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच नाले गाळाने भरू नयेत यासाठी नाल्याची स्वच्छता करण्यात येत आहे. साळ नाल्याची स्वच्छता केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात यणार असल्याची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.

साळ येथील गणीसकोण ते कोळम (बाळूक) यापर्यंतच्या नाल्याच्या स्वच्छता कार्यक्रमाला सुरवात केल्यानंतर ते बोलत होते. सुमारे पाच लाख रुपये खर्च करून नाल्याची स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी लाटंबार्सेचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, साळचे सरपंच घनश्याम राऊत, पंचसदस्य, श्री महादेव भूमिका देवस्थान मंडळाचे अध्यक्ष कालिदास राऊत, जल संसाधन खाते, डिचोली-मुळगावचे सहाय्यक अभियंता नरेश पोकळे, कनिष्ठ अभियंता विवेक परब, ठेकेदार पद्माकर मळीक आदी उपस्थित होते.

साळ येथे पावसाळ्यात जो पूर येतो त्याचे एक कारण म्हणजे येथील गणीसकोण ते कोळम हा नाला पूर्णता गाळाने भरला जातो. नाल्याकाठी झुडपे वाढली असून, मातीची धूप होऊन ही माती नाल्यात साचलेली आहे. त्यामुळे पाण्याने आपली दिशा बदलायला सुरवात केली आहे. पावसाळ्यात नाल्यातून वाहणारे पाणी शेत जमिनीतून येते. ही बाब शेतकऱ्यांनी शेट्ये यांच्या निदर्शनास आणून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT