Development work Dainik Gomantak
गोवा

होंडा भागात विकास कामांचा धडाका, पुर स्थितीवर येणार नियंत्रण

पुर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना आखावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये (poriem) मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या परिसरात विकास कामांचा धडाका सुरू असून गेल्या कित्येक वर्षांपासून होंडा तिस्क परिसरात चांगली गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात पुरज्यन स्थिती निर्माण होत होती, काही काळ जरी पाऊस पडला की रस्त्याचा बराच भाग पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होताना दुकानदारांना फटका बसत होता.

या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी येथे उपाय योजना आखावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन सरकारने येथिल वडदेव मंदीर ते होंडा तिस्क पर्यंत रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था निर्माण केली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात या भागात येणाऱ्या पुरावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

होंडा तिस्क हे सत्तरी तालुक्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते, परंतू या परिसरात काही सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी दर पावसाळ्यात पुरज्यन स्थिती निर्माण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. गेल्या वर्षी पडलेल्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्ता पाण्याखाली गेलाच पण या भागातील दुकानात पाणी (water) जाऊन दुकानदारांना लाखो रुपयांचा माल खराब होऊन नुकसान झाले होते.

त्यामुळे येथे पुर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना आखावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय पातळीवर हालचाली होऊन रस्त्याच्या एका बाजूने पक्की गटार व्यवस्था निर्माण करण्याचे काम जोरात सुरु आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात सदर भागातील पुरज्यन स्थितीवर नियंत्रण येण्याची शक्यता असून नागरिकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे, त्याच प्रमाणे होंडा तिस्क ते भुईपाल पर्यंत रस्त्यांचे काही प्रमाणात रूंदीकरण करून त्या रस्त्या दरम्यान, हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले आहे, या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होते, त्यामुळे नागरिकांना वाहतूक (Transportation) करताना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करताना आरामदायी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT