MLA Dayanand Sopte Dainik Gomantak
गोवा

जनतेच्या मागणीनुसारच विकास होणार : आमदार सोपटे

जनतेने लवकर कामांची यादी द्यावी ती आपण पूर्ण करणार अशी ग्वाही मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी मोरजी वरचा वाडा येथील संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर दिली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदार संघाचा (Mandre Constituency) विकास हा जनतेच्या मागणीनुसार केला जाईल, विकास कोणत्या पद्धतीचा करावा यासाठी कामांची यादी त्या त्या पंचायतीने पंच सदस्यांनी द्यावी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्या निवडणुका आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे जनतेने लवकर कामांची यादी द्यावी ती आपण पूर्ण करणार अशी ग्वाही मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी मोरजी वरचा वाडा येथील संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर दिली.

23 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, स्थानिक पंच मुकेश गडेकर, पंच विलास मोरजे, पंच तुषार शेटगावकर, पंच सुप्रिया पोके, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, नयनी शेटगावकर, श्रुती केरकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर दीपक शेटगावकर, फुटूसिंग शेटगावकर, रविकांत मोरजकर आदि उपस्थित होते. आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना विकासासाठी कुणीच राजकारण करू नये, गावाचा आणि मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाला भाजपा सरकार सर्वतोपरी मदत करत आहे, जलसिंचन खात्या अंतर्गत केवळ मोरजी पंचायत क्षेत्रात आठ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, उर्वरित कामे लवकर पूर्ण केली जातील आणखी कामे आपल्या परिसरात असेल तर कळवा असे आवाहन केले.

स्थानिक पंच सदस्य मुकेश गडेकर (Mukesh Gadekar) यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे यांच्या कानी या कामाची माहिती घातली आणि जमीनदाराने लगेच समती दिल्यामुळे कामाचा शुभारंभ केला असल्याचे सांगून आमदार दयानंद सोपटे यांनी सरकारच्या सहकार्यातून विकास कामे सुरु असल्याचे पंच गडेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT