Save old goa action committee|Goa Heritage Master Plan GRN
गोवा

'Heritage Master Plan तयार करा अन्यथा..'; जुने गोवे वाचवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीचा पुढाकार

Save Old Goa Action Committee: पीटर व्हिएगस यांनी सांगितले की ओल्ड गोवा वारसा स्थळात अनेक बेकायदेशीर प्रकल्प आणि बांधकामे उभारली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Heritage Master Plan

पणजी: जुने गोवे वाचविण्यासाठी आणि वारसास्थळ म्हणून कायमस्वरूपी ओळख जपून ठेवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीने पुढाकार घेतला आहे. सरकारला आणि संबंधित खात्याला निवेदन देखील दिले आहे. जर सरकारने निवेदन मान्य करून जुने गोव वाचवण्यासाठी बफर झोनच्या सीमांकनासह प्रदर्शनापूर्वी हेरिटेज मास्टर प्लॅन तयार केला नाही, तर गोव्यातील जनतेला सोबत घेऊन सरकार विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.

समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीटर व्हिएगस यांनी सांगितले की, ओल्ड गोवा वारसा स्थळात अनेक बेकायदेशीर प्रकल्प आणि बांधकामे उभारली आहेत. अजून काही प्रकल्पांना परवानगी देखील देण्यात आली आहे. ओल्ड गोवा हे गोव्यातील एकमेव युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. ते जपून ठेवण्याचे काम सरकारचे आहे, पण सरकारच्या भूमिका वारसा स्थळ जपण्याच्या विरोधात आहेत. सरकारने आपले निर्णय मागे घेऊन या ठिकाणी ज्यांना बांधकाम आणि व्यवसायाला परवानगी दिली आहे ती परवानगी रद्द करावी.

प्रदर्शनापूर्वी हेरिटेज मास्टर प्लॅन तयार करण्याचे निवेदन मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष, नागरनियोजनमंत्री विश्वजीत राणे, ओल्ड गोवा पंचायत आणि मुख्य नगर नियोजकाला देण्यात आल्याची माहिती व्हिएगस यांनी दिली. ते म्हणाले की, याच वारसास्थळात प्रत्येकी १० शयनकक्षांसह ४ फार्म हाऊसना परवानगी दिली आहे. तसेच जनावरांसाठी पाणी पिण्याची सोय करण्यासाठी १०० मीटर पाण्याच्या टाकीची परवानगी देखील देण्यात आली आहे. ही पाण्याची टाकी नसून तेथे स्विमिंग पूल बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पीटर व्हिएगस यांनी ओल्ड गोवा पंचायतीवरही आरोप केला. व्हिएगस यांनी सांगितले की, एसएफएक्स चॅपलच्या भिंतीपासून अंतर न ठेवता बेकायदेशीर रस्‍त्‍याचे बांधकाम पंचायतीने केले आहे. याच वारसास्थळात हेरिटेज इंटरप्रिटेशन सेंटर येणार आहे. वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आणि नामांकित असताना असे प्रकल्प याच ठिकाणी कशे उभारले जाऊ शकतात? येथे उभारण्यात आलेला बेकायदेशीर बंगला अजूनही तसाच आहे हॉटेलला दिलेली परवानगीदेखील अजून रद्द केली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT