Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : भाजपला सत्ताभ्रष्ट करा! - युरी आलेमाव

मांद्रेतून हाथ से हाथ जोडो अभियानास प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress भाजपने देशात व राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून कटुता निर्माण केली. आज गोव्याचे भवितव्य तुमच्याच हातात असून मतभेद विसरून भाजपला सत्ताभ्रष्ट करणे गरजेचे आहे, असे आवाहन आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने राज्यात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले असून, मांद्रे विधानसभा क्षेत्र एक व त्या मतदारसंघातील बूथ एक केरी तेरेखोल पंचायत क्षेत्रात सुरू केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, रमाकांत खलप, बाबी बागकर, प्रदीप देसाई, गट अध्यक्ष नारायण रेडकर, रामचंद्र केरकर, तेरेखोलचे पंच गुदिन्हो उपस्थित होते.

आलेमाव म्हणाले, आम्ही म्हादईप्रश्नी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमची मागणी धुडकावून लावली.

भाजप दादागिरी करीत असून विधानसभा अधिवेशन चार दिवसाचे केले, यावरून भाजप सरकार विरोधकांना घाबरत आहे, हे स्पष्ट होते. काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसाठी असून प्रत्येक प्रश्नांवर आम्ही आवाज उठवू. जनतेने आम्हाला साथ द्यावी.

भाजप म्हणजे 'भ्रष्ट जुमला पार्टी'

भाजप सरकारने त्रिपुरा व अन्य राज्यांचे निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच गॅस दरवाढ करून जनतेला किती किंमत असते, याची जाणीव करून दिली. भाजप म्हणजे 'भ्रष्ट जुमला पार्टी'असून त्यांनी गोवेकरांचा विश्वासघात केला आहे.

त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. बेरोजगार युवकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये स्वीकारून नोकऱ्या देत आहेत, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT