Despite being 'A' class Margao Municipality fails in solid waste management Dainik Gomantak
गोवा

‘अ’ वर्ग असूनही मडगाव पालिका घन कचरा व्यवस्थापनात अपयशी

दैनंदिन कचरा तात्पुरता साळगाव प्रकल्पात नेण्यासाठी महामंडळाकडे परवानगी मागितली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव ही ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. कागदोपत्री तिला तो दर्जा मिळालाही आहे. त्या वर्गानुसार तिच्याकडे अधिकारी वर्गही आहे. तसेच तिला निधीचीही समस्या नाही. चौथ्या व पाचव्या वित्त आयोगाकडून मिळालेला निधीही तिच्यापाशी आहे. असे असतानाही घन कचरा व्यवस्थापन आघाडीवर नगरपालिका पिछाडीवर गेली असून त्याची अधिकतम कामे स्वतः करण्याचे टाळून ती घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपविणे तिने पसंत केले आहे.

उदाहरणच द्यावयाचे झाले, तर सोनसोडोवर साचलेल्या अनेक वर्षांच्या कचरा राशींचे देता येईल. पालिकेला शक्य न झाल्यानेच त्यांच्या रेमिडिएशनचे काम याच महामंडळाकडे सोपविले गेले. तेवढ्याने भागत नाही, तर आता रोजचे दारोदार कचरा गोळा कामही खासगी ठेकेदाराकडे सोपविण्याचा विचार सुरू आहे. सोनसोडो प्रकल्पात तुंबलेल्या साधारण 14 हजार टन ओला कचरा तेथून बाहेर हटविण्यासाठी पालिकेने महामंडळाकडेच मदत मागितली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन कचरा तात्पुरता साळगाव प्रकल्पात नेण्यासाठी महामंडळाकडे परवानगी मागितली आहे. कारण तेथे अजून वीजपुरवठा सुरू झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

SCROLL FOR NEXT