Margao Dainik Gomantak
गोवा

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरील तोडगा लांबणीवर, ट्रस्टच्या प्रस्तावावर विचार करण्यास मुदत

Chhatrapati Sambhaji Maharaj: मारुती मंदिर ट्रस्ट व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी संयुक्त बैठक बोलावली

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मारुती मंदिर ट्रस्ट व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी मडगावचे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी आज संयुक्त बैठक बोलावली.

दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे यावेळी मांडले. मारुती मंदिर ट्रस्ट तर्फे प्रेमींना एक प्रस्ताव दिला आहे. याबद्दल विचार करण्यासाठी संभाजी महाराज प्रेमींना सांगितले असून पुढील बैठकीत या संदर्भात तोडगा निघेल,असे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी सांगितले.

मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक यांनी सांगितले की, संभाजीराजांच्या पुतळ्याला हरकत नाही. पुतळा मंदिरासमोरील स्तंभाजवळ आहे. त्यामुळे पालखी प्रदक्षिणा काढता येत नाही. हा पुतळा थोडा हलवावा त्यामुळे पालखी प्रदक्षणा सुलभ होईल, असे निदर्शनास आणले आहे. या वेळी मंदिर ट्रस्टचे जगदिश शिरवईकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT