उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,(Babu Azgavkar) चित्रकार संजय हरमलकर, कला शिक्षक राजमोहन शेट्ये, सरपंच भूषण नाईक, माजी सरपंच वल्लभ वराडकर, काजोळी, आदी उपस्थित होते. Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यासाठी रवींद्र भवनसाठी जागा निश्चित; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

नियोजित क्रीडा नगरीतील जागा कला भवनसाठी संबधित खात्याच्या ताब्यात दिली आहे. परंतु काही नागरिक आणि कलाकार पेडणे शहरात मध्यावर्थी ठिकाणी कला भवन उभारावे अशी मागणी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे (Pedne) तालुक्यासाठी आणि कलाकाराना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा नगरीतील एकूण 30 हजार चौरस मीटर जागा कला आणि संस्कृती खात्याकडे सुपूर्द केली आहे. आणि कलाकारांनी पाठपुरावा करून नियोजित जागेत रवींद्र भवन (Rabindra Bhavan) उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी धारगळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने धारगळ पंचायत सभागृहात दीपोत्सव विविधारंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

धारगळ पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या दीपोत्सवात पेडणे आणि राज्य पातळीवर आकाश कंदील स्पर्धा , खाद्य पदार्थ तयार करणे, नृत्य स्पर्धा, वेशभूषा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी चित्रकार संजय हरमलकर, कला शिक्षक राजमोहन शेट्ये, सरपंच भूषण नाईक, माजी सरपंच वल्लभ वराडकर, श्री काजोळी, आदी उपस्थित होते.

आजगावकर म्हणाले, नियोजित क्रीडा नगरीतील जागा कला भवनसाठी संबधित खात्याच्या ताब्यात दिली आहे. परंतु काही नागरिक आणि कलाकार पेडणे शहरात मध्यावर्थी ठिकाणी कला भवन उभारावे अशी मागणी करत आहेत, परंतु जागा उपलब्ध होत नसल्याने अडचणी येतात जर नागरिक आणि कलाकारांनी निवडलेल्या जागेविषयी संपती असेल तर त्याचा पाठपुरावा आपण कलाकारामार्फत करणार असल्याचे सांगितले. शिवाय जे जे प्रकल्प मतदार संघात होऊ घातलेले आहेत त्यातील रोजगारही स्थानिकांनाच मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे त्यांनी सांगितले.

चित्रकार संजय हरमलकर यांनी बोलताना कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी अगोदर मनाची तयारी करायला हवी, सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली संस्कृती आणि परंपरा टिकून राहत असते असे हरमलकर म्हणाले.

प्रदूषण टाळा

देशात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचे वारे वाहत असल्याने दिवसाकाठी पाच वर्षाखालील आणि 60 वर्षावरील नागरिकांचे बळी जात आहे. त्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाना कोणत्याही उत्सवात फटाके मारायला बंधनकारक करावे अशी सुचना संजय हरमलकर यांनी केली.

यावेळी कला शिक्षक राजमोहन शेट्ये यांनी बोलताना दीपोत्सव साजरा करून मंडळाने नवोदित कलाकारासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सरपंच भूषण नाईक यांनी बोलताना कोरोना महामारीच्या काळात अनेक कार्यक्रमावर नियंत्रण आले, कोरोना कमी होत असल्यानेच अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, कलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम मंडळातर्फे वारंवार आयोजित केले जातील असे भूषण नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT