Pernem Excise Department Dainik Gomantak
गोवा

Pernem Excise Scam : पेडणे अबकारी खात्यातील घोट्याळ्याप्रकरणी तक्रार दाखल

सुमारे दोन कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दै. ‘गोमन्तक’ने उघड केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Fraud in Department Of Excise Goa : पेडणे अबकारी खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करून संपूर्ण पैसे वसूल केले जातील असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते.

त्यानंतर प्रकरणातील संबंधित तिघांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, पेडणे अबकारी खात्याचे अधिकारी व अबकारी आयुक्तांविरुध्द पेडणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मद्य विक्री परवान्याच्या नूतनीकरणातून व्यावसायिकांनी अबकारी खात्याला सुमारे दोन कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दै. ‘गोमन्तक’ने काही दिवसांपूर्वीच उघडकीस आणला होता.

पेडणे तालुक्यातील मद्यालयांकडून मद्य परवान्याचे नूतनीकरण न केल्याप्रकरणी अबकारी खात्याने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या.

या नोटिसा मिळताच 76 मद्य परवानाधारकांनी पेडणे येथील अबकारी कार्यालय गाठून त्यांनी नूतनीकरणाचे शुल्क भरल्याच्या पावत्या सादर केल्यावर या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता व खात्याने त्याची चौकशी सुरू केली होती.

या प्रकरणाची चौकशी करून खात्याने मुख्य सूत्रधार वरिष्ठ कारकून हरीश नाईक याच्यासह अबकारी निरीक्षक दुर्गेश नाईक व विभूती शेट्ये या तिघांना निलंबित करण्यात आले होते.

या प्रकरणात वरिष्ठ कारकून हरीश नाईक याने आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गैरव्यवहारातील रक्कम वसूल करण्यात आली.

दरम्यान, वरिष्ठ कारकुनाने दिलेल्या जबानीनुसार या घोटाळ्यामध्ये पेडणे कार्यालयातील आणखी काहीजण तरी गुंतलेले आहेत असा संशय आहे. तसेच अबकारी खात्याने इतर कार्यालयातील आर्थिक व्यवहाराची माहिती मागविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT