Dengue Cases Rise in Calangute Dainik Gomantak
गोवा

Calangute Dengue Cases: डेंग्यूचा कहर वाढताच! कळंगुटमध्ये रुग्णांचा आकडा पोहोचला 115 वर

राज्यात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.

Kavya Powar

Dengue Cases Rise in Calangute: राज्यात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला कळंगुट किनारी भागात असलेले रुग्ण आता राज्यभर पसरले आहेत.

कळंगुटमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पंचायतीने मोफत डेंग्यू चाचणी घेण्यास सुरुवात केली. तसेच संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना खबरदारीची उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते.

मात्र तरीही कळंगुटमध्ये रुग्णांची संख्या वाढतच आहे. 1 सप्टेंबरपासून इथे तब्बल 115 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. महिन्याभरापूर्वी डेंग्यूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता.

यानंतर पंचायतीने यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन आमदार मायकल लोबोंनी केले होते.

राज्यात आत्तापर्यंत डेंग्‍यूचे तब्‍बल 11010 संशयित रुग्‍ण सापडल्‍याने खळबळ माजली आहे. सध्या डेंग्यूने डोके वर काढले असून जनतेत घबराट पसरली आहे. कांदोळी, मुरगाव, चिंबल बरोबर राज्यभर रुग्ण सापडत असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगून आपल्‍याबरोबर इतरांचेही आरोग्‍य जपायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT