Dengue Malaria Cases Dainik Gomantak
गोवा

Margao: गोमंतकियांनो काळजी घ्या! पावसाचे आगमन होताच दक्षिण गोव्यात मलेरिया, डेंग्यूचे वाढले रुग्ण

South Goa Dengue Malaria Cases: पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि मलेरिया आजाराने दक्षिण गोव्यात मान वर काढलेली दिसत आहे. आतापर्यंत मलेरियाचे २८ आणि डेंग्यूचे ५१ रुग्ण दक्षिण गोवा आढळले आहेत.

Sameer Amunekar

मडगाव: पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि मलेरिया आजाराने दक्षिण गोव्यात मान वर काढलेली दिसत आहे. आतापर्यंत मलेरियाचे २८ आणि डेंग्यूचे ५१ रुग्ण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारांसाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

यंदा १५ दिवसांपूर्वीच पावसाने राज्यात हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे. दोन दिवस मध्येच पावसाने दडी मारल्याने यात डासांची पैदास व्हायला सुरवात झाली असून डेंग्यू, मलेरिया झालेले रुग्ण आता पुढे येऊ लागले आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी सुमारे ६०० पुरुष आणि ३५१ महिला डेंग्यू रुग्ण इस्पितळात उपचारांसाठी दाखल झाले होते. यंदा, आतापर्यंत ३७ पुरुष आणि १४ महिला डेंग्यू रुग्ण इथे उपचारांसाठी दाखल झाले.

दरम्यान, पावसाने उसंत घेतल्याने साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढू लागली आहे, त्यामुळे नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन केले आहे.

२२ पुरुष व ६ महिलांना मलेरिया

डॉ. बोरकर म्हणाले की, गेल्यावर्षी सुमारे २०४ पुरुष आणि २१ महिलांना मलेरियाची लागण झाली होती. यंदा २२ पुरुष आणि ६ महिलांना मलेरिया झाला. हे सर्व रुग्ण इथे इस्पितळात दाखल होऊन वैद्यकीय उपचार घेत होते. वरील प्रकरणांमध्ये, डेंग्यू किंवा मलेरिया झालेले रुग्ण हे जास्त प्रमाणात हे मजूर वर्गातील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT