Rudreshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Harvalem: 'रुद्रेश्‍‍वर देवस्थान'बाबतीत सरकारने तातडीने पावले उचलावीत; 'निवडणूक घ्या' अशी माजी महाजनांची मागणी

Rudreshwar Devasthan Temple: गेली नऊ वर्षे न झालेली हरवळे येथील श्री रुद्रेश्‍‍वर देवस्थानची निवडणूक यंदा तरी व्हावी म्हणून सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी माजी महाजन गुरुदास सावळ यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rudreshwar Temple Elections

पणजी : गेली नऊ वर्षे न झालेली हरवळे येथील श्री रुद्रेश्‍‍वर देवस्थानची निवडणूक यंदा तरी व्हावी म्हणून सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी माजी महाजन गुरुदास सावळ यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

देवस्थान समितीने तयार केलेली महाजनांची यादी सदोष असल्याचा दावा करून एका महाजनाने नऊ वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर देवस्थान भंडारी समाजाचे असल्याचे मानले जाते व राज्‍यभरातील भंडारी बांधव महाजन झाले होते.

मात्र महाजन कायद्यानुसार, ज्या लोकांनी देवस्थानची नोंदणी केली आहे, त्यांचे वारसच महाजन बनू शकतात हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य केला होता. तसेच महाजनांच्‍या यादीचा फेरआढावा घेण्यासाठी माजी सत्र न्यायाधीश प्रमोद कामत यांचा एक सदस्यीय लवाद नेमला होता.

दरम्‍यान, गेल्या नऊ वर्षांत हे काम पूर्ण न झाल्याने देवस्थानच्‍या निवडणुका झालेल्या नाहीत. आता पुढील त्रैवार्षिक निवडणूक फेब्रुवारी २०२५ मध्ये होऊ घातली आहे. ती घेता यावी म्हणून‌ ३१ डिसेंबर २०२४ संदर्भ तारीख धरून महाजन यादी तयार करावी लागेल. गेल्या नऊ वर्षांत निवडणूक न झाल्याने अस्थायी समिती कारभार हाताळत आहे. त्यामुळे साखळीचे आमदार या नात्याने मुख्‍यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी सावळ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT