Protest Dainik Gomantak 
गोवा

संरक्षक नागरी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी

अखिल गोवा नौदल नागरी कर्मचारी संघाने धरणे आंदोलन करून फ्लाईंग ऑफिसर कमांडिंग यांना निवेदन दिले.

दैनिक गोमन्तक

वास्को: संरक्षक नागरी कर्मचाऱ्यांच्या समस्या व स्थानिकांच्या तक्रारींविषयी भारतीय मजदूर संघ तसेच भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, अखिल गोवा नौदल नागरी कर्मचारी संघाने संयुक्तरित्या वास्को येथील फ्लाईंग ऑफिसर कमांडिंग यांना निवेदन देऊन मागण्या मान्य करून समस्येचे निवारण करण्याची मागणी केली. यावेळी मुख्य गेटवर धरणे आंदोलनही करण्यात आले.

केंद्रीय कार्यकारिणी समिती सदस्य तसेच गोवा राज्य भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस के. प्रकाश यावेळी उपस्थित होते. त्यांनी माहिती देताना गोवा नौदल क्षेत्रातील कर्मचाऱ्‍यांच्या तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित असून यात मुख्य सर्व संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा अजून उपलब्ध नसून ती उपलब्ध करून द्यावी, तसेच वास्कोजवळ नवीन वेलनेस सेंटर कर्मचाऱ्यांसाठी करावे अशी मागणी केली. गोव्यात कार्मिक संरक्षण उपकरणे जारी केले गेले नाही किंवा कोणताही गणवेश भत्ता जारी केला गेला नाही. वरुणापुरी येथे संरक्षण नौदल नागरी निवासस्थानांची कमतरता आहे.

गोव्यातील अंतर्गत हॉस्पिटलचे पॅनेल न केल्यामुळे, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे दावे नागरी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत.प्रलंबित मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न केल्याने तक्रारी निदर्शनास आणून दिल्या आहेत. भागधारकांशी संवादाच्या माध्यमातून द्विपक्षीय चर्चेद्वारे समस्या सोडवाव्यात अशी मागणी गोवा राज्य भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस के. प्रकाश यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT