Margao Kokan Railway Bridge  Dainik Gomantak
गोवा

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

Margao Kokan Railway Flyover: पावसामुळे उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला असून केवळ खड्डे बुजविण्यापुरती स्थिती या रस्त्याची नसून उड्डाणपुलावरील संपूर्ण रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची गरज आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Kokan Railway Flyover Bridge Margao Navelim

सासष्टी: मडगावमधील कोकण रेल्वे उड्डाणपूल हा मडगाव व नावेली यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. काणकोण, कारवार व पुढे जाणारी वाहने याच उड्डाणपुलावरून जात असतात. शिवाय स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते.

मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांत पडत असलेल्या पावसामुळे उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला असून केवळ खड्डे बुजविण्यापुरती स्थिती या रस्त्याची नसून उड्डाणपुलावरील संपूर्ण रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची गरज आहे, अशी मागणी लोक करू लागले आहेत.

एक-दोन वर्षांपूर्वी या उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती व त्यासाठी वाहतुकीवरही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, या पावसामुळे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब झाला आहे. वाहनांना खासकरून दुचाकीस्वारांना त्याचा जास्त फटका बसत आहे.

या उड्डाणपुलाची नियमित देखभाल होत नाही, अशी लोकांची तक्रार आहे. ज्या कंत्राटदाराने या रस्त्याची दुरुस्ती केली त्याची चौकशी सरकारने करावी, अशी मागणीही लोक करू लागले आहेत. या पुलावरील रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे व तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे एका स्थानिकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

SCROLL FOR NEXT