Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

सांगे मतदारसंघाला मंत्रिपद द्यावे अशी मागणी; भाजप मंडळाची नाराजी

नऊ जणांच्या शपथविधीत सुभाष फळदेसाई यांचे नाव नसल्याने सांगे भाजप मंडळाने नाराजी व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

डिचोली: सांगे मतदारसंघाला यावेळी तरी मंत्रिपद द्यावे अशी मागणी सांगे भाजपने केली आहे. आज मुख्‍यमंत्र्यांसह नऊ जणांचा शपथविधी झाला, मात्र त्‍यात सुभाष फळदेसाई यांचे नाव नसल्याने सांगे भाजप मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्‍यान, पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात डिचोली मतदारसंघाला संधी मिळाली नसल्याने या मतदारसंघातही नाराजी पसरली आहे. सुमारे 22 वर्षांपासून वंचित राहिलेल्या या मतदारसंघाला यावेळी तरी मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. सांगे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून पाच वेळा पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. पण अजूनही हा मतदारसंघ

मंत्रिपदापासून वंचित आहे. यावेळी तरी मंत्रिपद मिळाले पाहिजे असे माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी सांगितले. सांगे मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बराच मोठा असून अनुसूचित जमातीच्या लोकांचा अधिक भरणा आहे. त्‍यामुळे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे व यासाठीच सांगेला मंत्रिपदाची आवश्यकता आहे असे गावकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, राजेश गावकर, वैशाली नाईक व कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती. दरम्‍यान, सांगेला मंत्रिपद मिळणार या आशेने आज शपथविधी सोहळ्याला मतदारसंघातील शेकडो भाजप कार्यकर्ते गेले होते. पण आमची घोर निराशा झाली, असे या लोकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT