Demand for a full time governor who will do justice to the people of Goa 
गोवा

आमदार ढवळीकर ‘आत्मनिर्भर’ बनून प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात ‘स्वयंपूर्ण’ होण्याचा विचार करीत असावेत

गोमंन्तक वृत्तसेवा

सासष्टी: पंतप्रधान कार्यालय कोविड आजारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) कोविड(Covid-19) व्यवस्थापनाची जबाबदारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे  द्यावी, अशी मागणी भाजप(BJP) नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी(Dr. Subramanian Swamy) यांनी केल्यामुळे मगो(MGO) पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर(Sudin Dhavalikar) यांच्या अंगावर रोमांच उभा राहिला असून त्यामुळेच त्यांनी गोवा(Goa) सरकारला मुदतवाढ देण्याचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील, बेजबाबदार व अकार्यक्षम भाजप सरकारला मुदतवाढ देणे केवळ घटनाविरोधी नसून हा एक महाभयंकर गुन्हा ठरणार आहे, असा आरोप कॉंग्रेस(Congress) अध्यक्ष गिरीश चोडणकर(Girish Chodankar) यांनी केला. (Demand for a full time governor who will do justice to the people of Goa)

गोव्यात आगामी निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलाव्यात व विद्यमान सरकारला मुदतवाढ द्यावी किंवा राष्ट्रपती शासन लागू करावे असे वक्तव्य मगो आमदार सुदिन ढवळीकर यांनी करणे धक्कादायक आहे. सुदिन ढवळीकर हे ज्येष्ठ आमदार असून त्यांना घटनेची जाण असायलाच पाहिजे. भारतीय घटनेत कोणत्याही सरकारला मुदतवाढ देण्याची तरतुद नाही, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. देशवासीय आज भाजप सरकारला कोविड व अर्थव्यवस्थेच्या गैरव्यवस्थापनाबद्दल शाप देत आहेत. परंतु, मगोचे आमदार भाजप सरकारला मुदतवाढ देण्याची दिवसाच स्वप्ने पाहात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सत्तेपासून जास्त काळ दूर राहिल्यामुळे आमदार सुदिन ढवळीकर यांची घुस्मट सुरू झाली आहे का? डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची ते वाट पाहत आहेत का? असे प्रश्न गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केले. आमदार सुदिन ढवळीकर यांनी बरोबर वेळ साधून हे वक्तव्य केले आहे हे सांगायला वैज्ञानिकाची गरज नसून राजकीय संधिसाधूपणा व सत्तेची लालसा त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे. खरेतर गोव्यात लोकांना न्याय देणारा पूर्णवेळ राज्यपाल देण्याची मागणी करणे त्यांच्याकडून अपेक्षित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

भाजप नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामींचे वक्तव्य ऐकल्यानंतर, सुदिन ढवळीकरांना ते सार्वजनिक बांधकाममंत्री असतानाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या आशीर्वादाने अनुभवलेले ‘अच्छे दिन’ आठवले असून आमदार ढवळीकर आता ‘आत्मनिर्भर’ बनून डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात ‘स्वयंपूर्ण’ होण्याचा विचार करीत असावेत, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. गोमंतकीय जनता राजकीय घडामोडी उघड्या डोळ्यांनी बघत असून कोविड आजाराने लोक मरत असताना आपला राजकीय स्वार्थ साधण्याची खेळी खेळणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT