Goa Fraud News  Dainik Gomantak
गोवा

लोकांना करोडोंचा गंडा घातलेल्या नूर अहमदच्या अटकेची मागणी

लाखो रुपये देऊन फसलेल्या लोकांनी आज सकाळी वास्को पोलिस स्थानकांत धाव घेऊन त्या ठकसेनाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

पंधरा दिवसापूर्वी शंभरहून अधिक लोकांना सात करोड रुपयांना गंडा घालून गेलेल्या नूर अहमद या ठकसेनाला आजपर्यंत अटक न झाल्याने तसेच त्याचा कोणाताच थांगपत्ता नसल्याने लाखो रुपये देऊन फसलेल्या लोकांनी आज सकाळी वास्को पोलिस स्थानकांत धाव घेऊन त्या ठकसेनाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

तुम्ही अमुक लाख रुपये द्या, मी ते व्यवसायामध्ये गुंतवितो, तुमचे पैसे तुम्हाला अमूक वर्षाक परत मिळतील त्यासाठी सुरक्षा हमी म्हणून कोरा धनादेश घ्या. तसेच अमुक वर्षांपर्यत फ्लॅटमध्ये विनाभांडे रहा असे सांगून गरीब, गरजू लोकांकडून लाखो रुपये गोळा करून नूर अहमद हा बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याने फसवणूक झालेल्या लोकांनी 7 जुलै रोजी वास्को पोलिस स्थानकामध्ये धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंद केली होती.

तसेच डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. त्या लोकांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या होत्या. साळकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्याकडे चर्चा करून त्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन साळकर यांनी दिले होते.

या प्रकरणात लुबाडले गेलेल्यांची संख्या स्पष्ट होऊ शकली नाही. त्यामध्ये वास्को परिसरातील नव्हे तर गोव्यातील इतर भागातील लोकांनाही फसवले असल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान नूर अहमद याला देण्यासाठी बँक, नातेवाईक यांच्याकडून जे कर्ज घेतले होते ते कसे फेडावेत ? काहीजणांनी आपले घर गहाण ठेवून, तर काहींनी आपले घर विकून फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न पाहिले होते. आता कोठे जावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे.

नूर अहमद याने बऱ्याच फ्लॅट मालकांनाही फसविले आहे. त्यांना कोरा धनादेश देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे नूरने ज्या लोकांना फ्लॅटमध्ये ठेवले होते त्यांच्याकडे फ्लॅट मालकांनी भाडे मागण्यास आरंभ केला आहे.

एक तर भाडे द्या नाहीतर फ्लॅट सोडा असे फ्लॅट मालकांनी संबंधीतांना सांगितले आहे. नूर अहमद हा त्या फ्लॅटमालकाला भाडे देत असल्याने आपल्या फ्लॅटमध्ये पोट भाडेकरून ठेवला आहे हे फ्लॅट मालकाला माहिती नव्हते.

फसलेल्या पैकी काहीजणांनी आपले जूने राहते घर विकले. काही जणांनी राहते घर गहाण ठेवले होते. काहीजणांनी दागदागिने विकले, काहीजणांनी बँक, नातेवाईकांकडून कर्ज घेतले. मिळालेली रक्कम नूर अहमदच्या स्वाधीन केली आणि सर्व काही गमावून बसले.

दरम्यान नूर याच्या विरोधात काहीजणांक 7 जूलैला वास्काे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करूनही आजपर्यत नूर अहमद याचे धागेदोरे सापडले नसल्याने तसेच त्याला अटक करण्यास वास्को पोलिस अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून संबंधीत आज सकाळी पुन्हा एकदा वास्को पोलिस स्थानकात धाव घेऊन नूर अहमद या ठकसेनाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

आम्ही कर्जबाजारी झालो असून आमच्याकडे काही एक राहीले नसल्याचे ते म्हणाले. तेव्हा त्या ठकसेनाला लवकर अटक करून आमची कर्जापासून मुक्तता करा असे त्या लोकांनी आज हातात नूर अहमद याचे पोस्टर घेऊन पोलीस स्थानकासमोर ठिय्या ठीय्या मांडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT