Demand for repair of residential blocks of police Dainik Gomantak
गोवा

पोलिसांच्या निवासी गाळ्यांच्या दुरुस्तीची मागणी

पोलिसांच्या निवासी गाळ्यांची दुरावस्था होत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे शहरातील पोलिस ठाण्याची इमारत सुसज्य स्थितीत आहे; मात्र पोलिसांचे निवासी गाळे भूतबंगले बनलेले आहेत. इमारतीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या निवासी गाळ्यांची दुरावस्था होत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवासी गाळ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक सिद्धेश पेडणेकर यांनी केली आहे.

पेडणे तालुक्याच्या जनतेच्या सुरक्षतेची जबाबदारी या पोलिस ठाण्यावर आहे. या ठाण्याच्या अंतर्गत हरमल चौकी व पत्रादेवी चौकी येते. आता मोपा विमानतळ होऊ घातल्याने त्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे होणार आहे. शिवाय मांद्रे मतदारसंघातील संपूर्ण किनारपट्टीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

पेडणे पोलिस ठाण्याची इमारत सुसज्य बनवली आहे. त्या ठिकाणी पूर्वी पोर्तुगीजकालीन इमारत होती. त्या ठिकाणी कोणत्याच सोयी सुविधा नव्हत्या. मात्र, नवीन पोलिस इमारत झाल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा, पोलिसांना आराम करण्यासाठी खोल्या, स्वतंत्र कश्र, शौचालय, 24 तास पाण्याची सोय, महिला पोलिसांना स्वतंत्र खोल्या आदी सुविधा उपलब्ध आहेत.

पेडणे पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या निवासी गाळे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. कारण या ठिकाणी सात-आठ पोलिस कुटुंबे राहतात. परंतु त्या ठिकाणी कोणतीच स्वच्छता नाही, रंगरंगोटी नाही. जुने निवासी गाळे दुरुस्तीसाठी योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, कंत्राटदार धिम्यागतीने काम करत आहे. गाळे सध्या धोकादायक स्थितीत आहेत. अनेक गाळ्यांना गळती लागलेली आहे. पावसाळ्यात पाणी झिरपते, या निवासी घरांची त्वरित दुरुस्ती होण्यासाठी संबंधितांनी करावेत, अशी मागणी नगरसेवक पेडणेकर यांनी केली आहे.

पोलिस ठाण्यातील बलाबल : पेडणे पोलिस ठाण्यावर 1 पोलिस निरीक्षक, 4 पोलिस उपनिरीक्षक, 2 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 18 हवालदार, 54 पोलिस कॉन्स्टेबल, 11 महिला पोलिस यांचा समावेश आहे. त्यातील हरमल पोलिस चौकीवर 2 हवालदार, 1 पोलिस उपनिरीक्षक, 1 कॉस्टबल तसेच पत्रादेवी येथे 1 पोलिस कॉस्टबल व 1 होमगार्ड कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT