Demand for Goa Assembly Election by Ballot Paper  Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी

Goa Assembly Election: मतदान यंत्रात काहीतरी काळेबेरे होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी: मतदान यंत्राद्वारे झालेले मतदान हे सत्ताधारी पक्षाला लाभदायक ठरते. कारण मतदान यंत्रात काहीतरी काळेबेरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोवा विधानसभेची येती निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी. अशी मागणी गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी केली आहे.

आज आल्तीनो पणजी येथे पत्रकाराशी बोलताना बर्डे म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांनी राजकिय पक्षांना मतदान यंत्रे आल्तीनो येथे आणण्यात आल्याचे कळवल्यानंतर आपण ती पाहण्यासाठी येथे आलो तर अद्याप मतदानयंत्रे यायची असल्याचे सांगण्यात आले. फक्त व्हीवीपॅट तेवढी आली आहेत. त्यामुळे मतदान यंत्रात सत्ताधारी पक्षाला हवा तसा डाटा बसवून आणली जाण्याची शंका आपणास आहे. गोवा सरकारने जिल्हा पंचायत निवडणूक जशी मतपत्रिकेद्वारे घेतली तशीच विधानसभा निवडणूकही मतपत्रिकेद्वारेच घ्यावी.

असी आपली मागणी असून सोमवार ता. 4 ऑक्टोंबर रोजी राज्य निवडणूक आयुक्तांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे तशी मागणी करणारे निवेदन देण्यात येणार असल्याचे बर्डे म्हणाले. अनेक राज्यात निवडणूका होईपर्यंत व गोव्यातीलनिवडणूकांची मतमोजणी राखून ठेऊ नये. मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मतमोजणी करावी. असी मागणीही यावेळी बर्डे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT