Morjim construction Dainik Gomanatk
गोवा

नेत्यांचा अजब न्याय; 27 कोटींवर फिरणार पाणी

भाजपा कार्यकर्त्यांनी बांधकाम बंद पाडले होते

दैनिक गोमन्तक

मोरजी : कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील बैलपार नदी शेजारी जलसिंचन खात्यामार्फत 27 कोटी रुपये खर्च करून पंप हाऊस बांधण्याचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. ते बांधकाम बेकायदा असल्याचा दावा करत पंचायतीने संबंधित खात्याला काम बंद ठेवण्यासाठी नोटीस पाठवली आणि दुसऱ्या बाजूने विधानसभेच्या निवडणुकापूर्वी (Election) या बांधकामाचा शुभारंभ सरपंच रमेश पालयेकर यांच्या उपस्थिती उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.

आता तेच सरपंच हे बांधकाम बेकायदा ठरवून बंद करण्यासाठी नोटीस पाठवत आहेत. त्याबद्दल नागरिक संभ्रमात पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूने शनिवारपर्यंत हे बांधकाम (Construction) बंद पाडले नाही तर या विरोधात धरणे आंदोलन धरण्याचा इशारा मोपा पंचक्रोशी पिडीत जन संघटनेने दिला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात बैलपार नदीला महापूर येतो त्यात भर पडते ती तिळारीचे पाणी भरल्यानंतर सोडले जाते त्या दिवशी तर पूर्ण बैलपार पूल परिसरातील घराना धोका संभवत असतो, मुख्य रस्त्ये पाण्याखाली जातात, लोकांचा संपर्क तुटतो, काही लोकांना पूरग्रस्त भागातून हलवावे लागते. बैलपार नदीवर जो जुना बंधारा आहे त्याला वाहून येणारी लाकडे अडकतात आणि पाणी वाट मिळेळ तसे ते मुख्य रस्त्यावर येते, तो बंधारा पाडवा अशी मागणी स्थानिकांनी निवडणुका पूर्वी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे केली होती, स्थानिकांना वाटले तोच बंधारा मोडण्याचे काम सुरु आहे, परंतु त्या नदी किनारी 27 कोटी रुपये खर्च करून पंप हाऊस उभारण्याचे काम सुरु झाले.

नदीचे पाणी वळवण्याचा प्रकार

बैलपार नदीच्या पाण्यावर शेकडो, शेतकरी बागायतदार अवलंबून असतात. आता हे पाणी नक्की कुठे वळवण्यात येते या विषयी जलसिंचन खात्याचे अधिकारी श्री देशपांडे यांच्याकडे संपर्क साधला असता या नदीचे पाणी तिलारी कालव्यात सोडून पेडणे (Pernem) तालुक्यातील शेतकऱ्यांनाच पूरवठा केला जाईल असा दावा केला.

स्थानिक म्हणतात पाणी प्रकल्पासाठी

येथील शेतकऱ्यांकडे संपर्क साधला असता या नदीचे पाणी मोपा विमानतळ (Airport) परिसरात जे विविध प्रकल्प आणि गेम्ब्लिंग झोन केसिनो होवू घातलेले आहे, त्या प्रकल्पासाठी पाणी वळवण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी बांधकाम बंद पाडले होते

मागच्या चार दिवसापूर्वी भाजपचे (BJP) नेते प्रवीण आर्लेकर यांच्या नैतृत्वाखाली काही भाजपा समर्थकांनी हे बांधकाम बंद पाडण्याचा प्रकार घडला होता, परंतु दुसऱ्या दिवशी हे बांधकाम परत चालूच होते, आता पंचायतीने पुढाकार घेवून हे बांधकाम बंद ठेवावे म्हणून लेखी नोटीस जलसिंचन खात्याला पाठवली आहे.

सरपंच रमेश पालयेकर यांच्याकडे संपर्क साधला असता कोणत्या प्रकारचा प्रकल्प उभारला जातो या विषयी पंचातीला काहीच माहिती नसल्याचे सांगून पंचायत मंडळ आता लोकासोबत असणार असल्याचे सांगितले. या कामामुळे बैलपार पुलाच्या कठड्याना धोका निर्माण झाला असून, ठीक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT