Demand for action for misappropriation of crores of land in Calangute Dainik Gomantak
गोवा

आसगावात कोट्यवधींच्या जमिनीचा गैरव्यवहार, कारवाईची मागणी

जमिनींच्या बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर विक्री करणाऱ्या जमीन माफियांच्या विरोधात ग्रामस्थ एकवटलेले

दैनिक गोमन्तक

कळंगुट : आसगाव बार्देश येथील खासगी जमिनीतील जुन्या झाडांच्या कत्तलीचे षडयंत्र शनिवारी ग्रामस्थांनी उधळून लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बार्देशातील किनारी भाग आणि आसगाव पंचायत क्षेत्रातील बहुतेक जमिनी बनावट कागदपत्रांद्वारे परप्रांतीय लॅण्ड माफीयांकडून परस्पर विक्रीस काढल्याचा आरोप ॲड. क्रिस्तीना डायस, ॲड. आगासेस मोन्तेरो व इतरांनी केला. (Demand for action for misappropriation of crores of land in Calangute)

आसगाव येथील पुरातन चर्चच्या प्रांगणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. डायस बोलत होते. त्यांनी सांगितले की, परप्रांतीय जमीन माफीया आसगाव व परिसरातील जुनी बंद घरे हेरून बनावट व्यक्तीच्या नावाने त्या घरांची तसेच संप्पतींची कागदपत्रे तयार करून घेतात. तालुका मामलेदार यांच्यासह सबरजिस्ट्रारच्या अधिकाऱ्यांना मामा बनवत त्या संपत्तीची बेकायदा परस्पर विक्री करत असल्याचा आरोप ॲड. डायस यांनी केला.

आतापर्यंत, जमीन माफियांकडून बनावट कागदपत्रांद्वारे चाळीस ते पंचेचाळीस जमिनींची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप यावेळी ॲड. डायस व मोन्तेरो यांनी केला. आसगाव, बादे तसेच कायसूव येथील बनावट जमीन, बार्देशातील पर्वरी, म्हापसा तसेच शिवोली येथील अनेकांचा या गैरव्यवहारात हात असल्याचेही पत्रकार परिषदेत उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.

राजकीय व्यक्ती गुंतल्याची शक्यता

आसगाव येथील या कथीत जमीन गैरव्यवहार प्रकरणात सहभागी जमीन माफियांसोबत काही स्थानिक राजकीय व्यक्ती गुंतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आसगाव पंचक्रोशीतील जमिनींची बनावट विक्री करण्याचा भांडाफोड केल्यास राज्यातील शेकडो बनावट जमीन विक्री प्रकरणे उघड होणार असल्याचे ॲड. क्रिस्तीना डायस यांनी सांगितले.

वनमंत्र्यांनी लक्ष घालावे

सरकारातील वन खात्याचे कारभार सांभाळणारे ज्येष्ठ मंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पूर्वांपार मालकी हक्क असलेल्या स्थानिकांच्या जमिनींची बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा विक्री करणाऱ्या जमीन माफियांच्या मुळाशी जाऊन आरोपींना तात्काळ गजाआड करण्याची जोरदार मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT