Driver Theft Delhi Dainik Gomantak
गोवा

Driver Theft Delhi: दिल्लीत चोरी करून गोव्यात आला, कॅसिनोत उडवले 1 लाख रुपये

Delhi Theft Case Goa Arrest: दिल्लीत चोरी करून गोव्यात आलेल्या इंदुलुरीनं कॅसिनोत १ लाख रुपये गमावल्याची माहिती समोर आलीय.

Sameer Amunekar

पणजी: दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये एका चालकाने आपल्या मालकाच्या गाडीतून तब्बल १६ लाख रुपये किंमतीचे हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इंदुलुरी रंगा रेड्डी (वय ४३) याला गोव्यातून अटक केली आहे. दिल्लीत चोरी करून गोव्यात आलेल्या इंदुलुरीनं कॅसिनोत १ लाख रुपये गमावल्याची माहिती समोर आलीय.

दिल्लीत चोरी करून गोव्यात आलेल्या इंदुलुरीनं कॅसिनोत १ लाख रुपये गमावले. लाखाचे बारा लाख होतील, असे त्याला वाटले होते. प्रत्यक्षात मात्र चोरलेल्या दीड लाख रुपायांपैकी एक लाख रुपये गमावून बसला.

विशेष म्हणजे, १६ लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने सोबत असतानाही तो पणजीत ते विकू शकला नाही. दिल्लीतील या चालकाला दिल्ली पोलिसांनी गोव्यातून पकडलं.

नेमकं प्रकरण काय?

२४ मार्च रोजी ग्रेटर कैलास पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली. तिच्या गाडीतून हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे तिने सांगितले. तक्रारीनुसार गाडीत हिऱ्यांचा नेकलेस, हिऱ्यांचे कानातले आणि १.३ लाख रुपये रोख रक्कम होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोलिसांना संशयित चालक रंगा रेड्डी गायब असल्याचे आढळले. त्याचा फोनही बंद होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रेड्डीनेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी रेड्डीचा मागोवा घेत त्याला गोव्यातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो चार महिन्यांपासून तक्रारदार महिलेकडे चालक म्हणून काम करत होता. या काळात त्याने महिलेच्या दिनक्रमाची माहिती घेतली आणि चोरीचा कट रचला.

चोरी केल्यानंतर त्याने दिल्ली विमानतळावरून गोव्याचे तिकीट काढले आणि उर्वरित रक्कम कॅसिनोमध्ये उडवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी पूर्वी गुरुग्राममध्ये राहत होता. नोकरीच्या शोधात तो दिल्लीत आला आणि तक्रारदार महिलेकडे चालक म्हणून रुजू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: सरकारी नोकरीतील सुमारे २,५०० पदांवर होणार भरती!

Pakistan: देशाला उद्धवस्त करणारा हल्ला होणार, ओसामा खानच्या भविष्यवाणीने पाकड्यांची उडाली झोप; एअरस्पेस केला बंद

Viral Video: गजराज निघाला 'स्वच्छता दूत'! माणसांना लाजवेल हत्तीची 'ही' कृती; व्हिडिओ व्हायरल

Goa Rain: गोवेकरांनो सावधान! राज्यात रेड अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Watch Video: जिद्दी कुंबळे! तुटलेला जबडा घेऊन खेळला अन् लाराची विकेट घेतली; भारतीय क्रिकेट इतिहासातील 'तो' ऐतिहासिक क्षण

SCROLL FOR NEXT