Arvind Kejriwal In Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील लोकसभा जागा वाटप आणि इंडिया आघाडीबाबत अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

कोणतेही सरकार त्यांच्याकडे पैसे नाहीत असे म्हणू शकत नाही, ते असे म्हणत असतील तर याचा अर्थ ते पैसा खातायेत - केजरीवाल

Pramod Yadav

Arvind Kejriwal In Goa: लोकसभा तयारीचा आढावा तसेच राज्यातील आप नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर आहेत. बाणावलीत वेंझी व्हिएगस यांनी उभारलेल्या मोहल्ला क्लिनिकची पाहणी केजरीवाल यांनी केली.

यावेळी त्यांनी इंडिया आघाडी आणि गोव्यातील लोकसभा जागा वाटप याबाबत भाष्य केले. केजरीवाल यांनी गोव्यातील भाजप सरकारवरही टीका केली.

यावेळी यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संदीप पाठक, गोवा आपचे प्रमुख अमित पालेकर, आमदार वेंझी व्हिएगस उपस्थित होते.

आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. गोव्यातील लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत आमच्या आघाडीसोबत चर्चा सुरु आहेत. याबाबत निर्णय झाल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ, निर्णय काहीही असो पण येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा, असे केजरीवाल यांनी म्हटले.

विरोधी पक्षातील आमदार असून देखील वेंझी व्हिएगस यांनी त्यांच्या मतदारसंघात तीन मोहल्ला क्लिनिक सुरु केल्याबद्दल केजरीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पंजाब आणि दिल्लीत आमच्याकडे सत्ता आहे त्यामुळे तिथे अशा गोष्टी करणे आम्हाला शक्य आहे. पण, गोव्यात सत्ता नसताना देखील वेंझी यांनी क्लिनिक सुरु केले, याबाद्दल त्यांनी वेंझी यांचे कौतुक केले.

नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, पण सरकारला ते करण्याची इच्छा नाही, असे केजरीवाल म्हणाले.

गोव्याची सत्ता आपकडे असल्यास कसा होईल याचा विचार करा असेही केजरीवाल म्हणाले. कोणतेही सरकार त्यांच्याकडे पैसे नाहीत असे म्हणू शकत नाही, ते असे म्हणत असतील तर ते पैसा खातायेत असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT