Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejariwal: गोवा पोलिसांच्या समन्सवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की...

सरकारी मालमत्तांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी बजावली होती नोटीस

Akshay Nirmale

Arvind Kejariwal on Summon by Goa Police: गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 27 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश समन्स पाठवून दिले आहेत. त्यावर आज, शुक्रवारी अरविंद केजरीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी केजरीवाल यांना या समन्सबाबत विचारले असता, केजरीवाल म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मी नक्की जाईन.

उत्तर गोव्यातील पेडणे पोलिसांनी केजरीवाल यांना हे समन्स बजावले आहे. पेडणे पोलीसांनी केजरीवाल यांना सीआरपीसी कलम 41 (ए) अंतर्गत नोटीस बजावली आहे. राज्यातील मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचे पोलिसांच्या तपासाात दिसून आले आहे.

याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी केजरीवाल यांना समन्स बजावल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी केजरीवाल यांना 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पेडणे पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, याच प्रकरणात गोवा आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनाही नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Horoscope: भानु सप्तमीचा दुर्मिळ शुभयोग! 'या' राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; मान-सन्मान, यश आणि धनलाभाचे प्रबळ संकेत

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

SCROLL FOR NEXT