55th Iffi Festival In Goa Dainik Gomantak
गोवा

55th Iffi Festival In Goa: यंदाचा इफ्फी महोत्सव महिन्यावर येऊन ठेपला; प्रतिनिधी नोंदणीस उस्फूर्त प्रतिसाद!

55th Iffi Festival: पणजीत होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साधारण एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या या 55 व्या महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी जोरदारपणे चालू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: पणजीत होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साधारण एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या या 55 व्या महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी जोरदारपणे चालू आहे. महोत्सवाबरोबर समांतरपणे आयोजित होणाऱ्या फिल्म बाझारसाठीदेखील प्रतिनिधी नोंदणी आणि निर्मात्यांसाठी असलेल्या कार्यशाळांसाठी नोंदणी खुली झाली आहे.

यंदाच्या इफ्फीत प्रथमच पदार्पणासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आहे. नवीन दिग्दर्शकाने आपल्या पदार्पणात केलेल्या चमकदार कामगिरीची नोंद म्हणून हा पुरस्कार दिला जाईल. दिग्दर्शक म्हणून त्याच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठावर त्याची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार महत्त्वाचा असेल. 

'क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो' एक गेली तीन वर्षे भारतीय सिनेमा सृष्टीत प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या युवा कलाकारांसाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार बनले आहे. यात निवडलेल्या युवा कलाकारांना इफ्फीत औत्सुक्याने आणि रोमांचित वृत्तीने काम करताना आपण पाहू शकाल. कंट्री फोकस, रेट्रोस्पेक्टिव्ह, गोवन फिल्म विभाग तसेच आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचे विशेष क्युरेट केलेले पॅकेज या महोत्सवाचे भाग असतीलच, त्याशिवाय सिनेमा विषयक कार्यशाळा, मास्टर क्लासेस, शैक्षणिक सत्रे, पॅनल चर्चा यांची रेलचेलही या महोत्सवात असेल.

इंडियन पॅनोरमा विभागात तसेच महोत्सवाच्या स्पर्धा विभागात कुठले सिनेमा असतील याची उत्सुकता सर्वांनाच असते. काही दिवसातच या विभागातील चित्रपटांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यावर नंतर स्वतंत्रपणे चर्चा सुरू होतील. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या भारतातील सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्काराबद्लही अनेकांना उत्सुकता आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वरील उत्कृष्ट आशय असणाऱ्या वेब मालिकांना आणि त्यांच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT