Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

...म्हणून गोव्यात सत्ता स्थापनेला विलंब; तानावडेंनी दिले स्पष्टीकरण

भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड यांच्यासमवेत तानावडे यांनी राज्यपालांशी झालेल्या चर्चेबाबत मौन बाळगले.

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकार स्थापनेला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतली.

भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड यांच्यासमवेत तानावडे यांनी राज्यपालांशी झालेल्या चर्चेबाबत मौन बाळगले. पत्रकारांनी वारंवार विचारणा केल्यावर तानावडे म्हणाले की, ही एक औपचारिक भेट होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), तानावडे आणि धोंड यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याच्या पुढील दिवशी तानावडे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना भेटले. परिणामी या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले. सावंत परत एकदा सरकारचे नेतृत्व करणार असे स्पष्ट असले, तरीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. “हे 2-3 दिवस होळीत जातील. भाजप (BJP) एकत्रितपणे जिंकलेल्या चारही राज्यांमध्ये सरकार स्थापन करणार असल्याने गोव्यात सरकार स्थापनेला उशीर होत आहे,” तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT