Public property

 

Dainik gomantak

गोवा

सार्वजनिक मालमत्तेचं विद्रूपीकरण, पाठपुराव्यामुळे कारवाई; योगेश केळकर

‘गोयंकारपण’ हा शब्द केवळ घोषणा किंवा टॅगलाइन म्हणून न वापरता, गोवावासीयांच्या विचारांतून आणि कृतीतून ते प्रतिबिंबित झाले पाहिजे

दैनिक गोमन्तक

म्हापसा : गोवा राज्यातील पूल, भिंती आणि उड्डाणपूल यांसारख्या सार्वजनिक स्थानांवर काही राजकीय पक्षांनी स्टिकर्स चिकटवून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी, राज्य शासनाने केलेल्या कारवाईचे स्वागत करून, ‘ॲक्टिव्ह म्हापसा सिटिझन्स असोसिएशन’ने (आमका) सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही कारवाई सुरू झाली. असा दावा या संघटनेचे अध्यक्ष योगेश केळकर (Yogesh Kelkar) यांनी केला आहे.

योगेश केळकर यांनी 11 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सोशल मीडिया (Social media) आणि प्रिंट मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला होता. ‘आमका’च्या सदस्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आणि 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

या पाठपुराव्याच्या परिणामाची माहिती देताना योगेश केळकर म्हणाले, आम्ही केलेल्या पत्रांची अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे, याचा आम्हाला आनंद आहे आणि मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ’’ते पुढे म्हणाले, की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, असेही योगेश केळकर म्हणाले.

‘आम्ही गोवावासीयांसाठी कार्यरत’

आम्ही गोवा (goa) आणि गोवावासीयांसाठी कार्यरत आहोत आणि गोव्याची संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. ‘गोयंकारपण’ हा शब्द केवळ घोषणा किंवा टॅगलाइन म्हणून न वापरता, गोवावासीयांच्या विचारांतून आणि कृतीतून ते प्रतिबिंबित झाले पाहिजे, असेही योगेश केळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT