Sarmanas Cemetery Dainik Gomantak
गोवा

सारमानस स्मशानभूमीचे लोकार्पण सोहळा....

31 लाखांचा खर्च; गावातील लोकांना मोठा दिलासा

दैनिक गोमन्तक

डिचोली: ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 31 लाख रुपये खर्चून पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस येथे बांधलेल्या स्मशानभूमी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. निमंत्रित करूनही स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळ्याला मंत्री गोविंद गावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित न राहिल्याने अखेर त्यांच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडला.

काल बुधवारी आयोजित या सोहळ्याला ‘सेझा''चे वरिष्ठ अधिकारी जोसेफ कुयल्हो यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सेसाचे व्यवस्थापक संतोष मांद्रेकर, स्थानिक पंच अनिल नाईक आणि स्वप्‍निल फडते, ज्येष्ठ नागरिक गजानन (नाना) वरगावकर, अनिल चव्हाण, पांडुरंग चव्हाण, लक्ष्मण सावंत आदी उपस्थित होते. मांद्रेकर, फडते यांची भाषणे झाले. सुरूवातीस अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कुयल्हो यांनी फित कापून नामफलकाचे अनावरण केले. अनिल नाईक यांनी प्रास्ताविकपर भाषणात स्मशानभूमीसाठी ५०० चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सेसा कंपनीला धन्यवाद दिले. सूत्रसंचालन काशिनाथ मयेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT