Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सांगे येथे कुजलेल्या अवस्थेतील एका मुलीचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

महिनाभरापूर्वी मुलीची हत्या झाली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमन्तक

सांगे: पोलिसांनी काल रात्री आंबेघाट येथे एका मोठ्या पॉलिथिनच्या गोणीतून एका मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. महिनाभरापूर्वी मुलीची हत्या झाली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून हा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे.

(Goa Murder Case)

नेत्रावळीहून कोणकोणला जाणाऱ्या आंबेघाट येथे रस्त्याच्या बाजूला एका पिशवीत केपे पोलिसांना महिलेची हाडे सापडल्याने लोकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिं.5 रोजी दुपारी एक पर्यटक त्या रस्त्याने जात असताना लघुशंका करण्यासाठी थांबला असता त्याला एका पिशवीत हाडे असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, केपे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता एका पिशवीत हाडे असल्याचे दिसून आल्याने त्या हाडांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले.

ही हाडे मानवी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी संबंधीत मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज दि.6 रोजी शवचिकित्सा करण्यासाठी पाठवली असता ही हाडे महिलेची असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर महिलेचा खून दुसऱ्या ठिकाणी करून तो आंबेघाट येथील सुनसान रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असून केपे पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT