Vagator Beach Goa Dainik Gomantak
गोवा

Turtle Nesting Goa: 'कुठलेही प्रकल्प इथे उभे राहू शकत नाहीत; वागातोर किनाऱ्यावरील 'या' पट्ट्याला कासवांचे संवर्धन केंद्र घोषित करा'

Vagator Goa Turtle Nesting: हणजूण-वागातोर जैवविविधता समूहाने गोवा राज्य सरकारकडे व्हागतोर समुद्र किनाऱ्याला कासवांचे संवर्धन केंद्र घोषित करण्याची विनंती केली आहे

Akshata Chhatre

हणजूण: हणजूण-वागातोर जैवविविधता समूहाने गोवा राज्य सरकारकडे व्हागतोर समुद्र किनाऱ्याला कासवांचे संवर्धन केंद्र घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या मतानुसार वागातोर येथील वातावरण कासवांच्या प्रजननासाठी अधिक सुरक्षित आहे आणि म्हणूनच त्यांचे संवर्धन करत प्रजातींचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी सरकारने या ठिकाला संवर्धन केंद्र घोषित करावे अशी मागणी केली जातेय.

हणजूण-वागातोर जैवविविधता समूहाच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षापासून या ठिकाणी प्रजननासाठी येणाऱ्या कासवांची संख्या वाढली आहे, मात्र तरीही या किनाऱ्यावर कुठल्याही प्रकारचे सूचनाफलक दिसत नाहीत.

मागच्या पाच वर्षांपासून या ठिकाणाला कासवांचे संवर्धन केंद्र घोषित करावे अशी मागणी ते करत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आणि म्हणूनच समितीकडून व्हागतोर किनाऱ्यावर काही सूचनाफलक लावण्यात आले आहेत, जेणेकरून किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांना किंवा पर्यटकांना याची माहिती मिळेल आणि कासवांची कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.

समितीने दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणून ठरवलेल्या जागेत कोणत्याही प्रकारचे प्रकल्प उभे राहू शकत नाहीत, इथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास सरकारी मनाई असते.

वागातोरच्या या भागात अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले गेलेले नाही, किंवा शॅक्स देखील उभे नाही असे असतानाही कासवं काहीसं अंतर पार करून किनाऱ्यावर येतात आणि पुन्हा निघून जातात असं का? याचा शोध घेतला गेला पाहिजे अशी माहिती समितीने केली आहे.

गोव्यातील हेच पर्यावरण येणाऱ्या पिढीसाठी जपलं गेलं पाहिजे असं ते म्हणालेत. कासवांचे संरक्षण व्हावे आणि निर्सग येणाऱ्या पिढीसाठी जपून ठेवावा म्हणून मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, वनविभाग यांना विनंती करण्यात आलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT