Utpal Parrikar Live Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar: मनात अजूनही भाजपाच, पण...; उत्पल पर्रीकरांच्या 'मन की बात'

अपक्ष निवडणूक लढवण्यामागे गोव्याच्या जनतेचे हित असल्याचे प्रतिपादन उत्पल पर्रीकर यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक

Utpal Parrikar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सर्व राजकीय पक्षांतर्फ आपल्या उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे भाजपच्या उमेदवारीवरून पणजीतून लढण्यास उत्सुक होते. पण पणजीमध्ये त्यांचा विजय होणे असंभव आहे, असे पक्षश्रेष्ठींचे मत असल्यामुळे त्यांना भाजपची (BJP) उमेदवारी नाकारण्यात आली होती.

यादरम्यान त्यांना अनेक पक्षांकडून पाठिंबा देण्याचे प्रस्ताव मिळाले होते. पण या सर्व ऑफर्सना झुगारून त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पणजीतून अपक्ष पद्धतीने निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामागचे कारण विचारले असता ते म्हणाले, 'ज्या पक्षात माझ्या वडिलांनी कार्य केले आहे, त्याच पक्षातून विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवण्याची माझी इच्छा होती. पण पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. परंतु तरीदेखील गोव्यातील जनतेसाठी मला काम करायचे आहे. कारण मला गोव्यातील सर्वसामान्य जनतेची चिंता आहे. म्हणून मी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचे ठरवले आहे. माझा हा निर्णय गोवेकरांसाठी आणि त्यांच्याच बाजूने असणार आहे. त्यामुळे आता सर्व काही जनतेच्याच हातात आहे.'

उत्पल पर्रीकरांनी आता जाहीररित्या स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे. आता भाजपच्या नेत्यांची यावर नेमकी काय प्रतिक्रिया असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT