Thivim Fraud Case Danik Gomantak
गोवा

Fraud Case: नोकरीचे आमिष दाखवून युवकाची फसवणूक

Fraud Case: ओएनजीसी या भारत सरकारच्‍या आस्‍थापनात नोकरी देतो, असे सांगून एका भामट्याने मोरपिर्ला-केपे येथील एका युवकाला फसविले. याप्रकरणी पोलिस तक्रार केली आहे.

दैनिक गोमन्तक

Fraud Case: ओएनजीसी या भारत सरकारच्‍या आस्‍थापनात नोकरी देतो, असे सांगून एका भामट्याने मोरपिर्ला-केपे येथील एका युवकाला फसविले. याप्रकरणी पोलिस तक्रार केली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, कणिबाग-मोरपिर्ला येथील केवल गावकर नावाच्‍या युवकाने गोव्‍यातील एका वर्तमानपत्रात आलेल्‍या जाहिरातीच्‍या अनुषंगाने ओएनजीसीतील एका पदासाठी अर्ज केला.

या जाहिरातीत संपर्क क्रमांक दिला होता. या क्रमांकावर संपर्क केल्‍यानंतर या युवकाला गणवेशासाठी म्‍हणून ५,७५० रुपये जमा करण्‍यास कळविले.

ही रक्‍कम या युवकाने गुगल पे मार्फत पुरवली. त्‍यानंतर प्रशिक्षणासाठी म्‍हणून १३,५०० रुपये भरण्‍यासाठी या युवकाला फोन आला तेव्‍हा हा युवक सावध झाला व त्‍याने बेतुल येथील ओएनजीसीच्‍या एका अधिकाऱ्याकडे विचारणा केली.

तेव्‍हा हा बनवाबनवीचा प्रकार असल्‍याचे आढळून आले. त्‍यानंतर या युवकाने कुंकळ्‍ळी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपास कुंकळ्‍ळी पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT