गोवा

दुधाळ - काले चिरेखाणीत बुडून एकाचा मृत्‍यू

Manoday Fadte

मनोदय फडते

कुडचडे :

काले ग्रामपंचायत क्षेत्रातील पिल्लगाळ - दुधाळ येथील चिरेखाणीत पडून ४९ वर्षीय प्रभाकर राम गावकर यांचे निधन झाल्याची घटना उघडकीस आली. ही व्‍यक्ती शनिवारी सकाळपासून बेपत्ता  झाली होती आज पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह मिळाला. कुडचडे पोलिसांनी तो ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिसियोत पाठवून दिला आहे. 
पिल्लंगाळ - दुधाळ काले भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात चिरे उत्खनन केले जात होते. कालांतराने स्थानिकांनी विरोध केल्यामुळे चिरेखाणी बंद केल्‍या होत्‍या. पण, चारही बाजूंनी उघड्या सोडलेल्या चिरेखाणीत पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त होत असते. त्‍यापैकी एका बंद असलेल्या चिरेखाणीत पडून प्रभाकर गावकर यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. चिरे काढून तशाच सोडून दिलेल्या चिरेखाणींच्‍या सभोवताली कुंपण घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. 
सांगे केपे धारबांदोडा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणी आहेत. त्‍या आजही सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची व पावसाळ्यात तशाचा संरक्षणाविना सोडून दिलेल्या खाणीत पावसाचे पाणी भरून जंगली जनावरे, पाळीव प्राणी आणि माणूसही बुडून मृत्यू होत असल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांना युवासेनेतर्फे देऊन खाणी सभोवताली कुंपण घालावे किंवा खाणी बुजविण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने चिरे खाणींवर कोणतीही कारवाई केली नसल्‍याने नाराजी व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT